सोशल मीडियावर प्राण्यांच्या रेस्क्यूचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ लोकांना इमोशनल करतात. लोकही यातील लोकांचं भरभरून कौतुक करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
ज्यात एका कुत्र्याला काही लोकांनी कसं वाचवलं हे दाखवण्यात आलं आहे. इन्स्टावर pubity नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, जेव्हा कुत्रा जलाशयात अडकलेला असतो, तेव्हा लोकांच्या ग्रुपमधील एक व्यक्ती खाली येते. तर बाकीचे लोक त्याला वाचवण्यासाठी प्लान बनवताना दिसत आहेत. यानंतर सगळे लोक एकमेकांचा हात पकडून चेन बनवत खाली येतात. नंतर सगळ्यात शेवटी असलेली व्यक्ती कुत्र्याला पकडते. बाकीचे लोक वर वर जातात. असा सगळ्यांनी मिळून कुत्र्याचा जीव वाचवला. या व्हिडीओला १४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे.
Users Today : 36