मा.नगरसेवक धनंजय गावडे यांची सदिच्छा भेट..
ता, १६, नालासोपारा :- नालासोपारा समेळगाव येथिल अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाच्या वतिने व कै.रोहन प्रविण खेडेकर यांच्या स्मृति प्रित्यार्थ मंडळाच्या वतिने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरास मा.नगरसेवक धनंजय गावडे व महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी भेट देऊन रक्तदात्याना प्रमाणपत्र देण्यात आले.
केवळ गणेशोत्सवात नव्हे, तर वर्षभर कार्यरत असणारे मंडळ ही ओळख अजिंक्य मंडळाने जोपासली आहे
अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाचे यंदा २५ व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.
गणेशोत्सव नवरात्र उत्सवाबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा या मंडळाने उमटवला आहे,
अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळ हे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असते,
मंडळ दर वर्षी जमेल ती रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी देते.
मिळलेल्या रकमेतून समाजोपयोगी कार्य हे अजिंक्य मंडळ करत असते,
परिसरातील नागरीकांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर आधार कार्ड शिबीर आदी कार्यक्रम मंडळ राबवत असते,
अजिंक्य सार्वजनिक मंडळाचे नावलौकिक दिवसेंदिवस वाढत असुन सर्वस्तरावर कौतुक व्हावे हिच सदिच्छा व शुभेच्छा मा.नगरसेवक धनंजय गावडे व महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या वतिने देण्यात आले.
यावेळी मंडळाचे रूपेश चव्हाण, तुषार नेवरेकर, सचिन मोरे, व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.