अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडी कायम चर्चेत असते. परंतु, सध्या आलिया-रणबीरपेक्षा त्यांच्या लेकीची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. त्यांची लेक राहा संपूर्ण बॉलिवूडपासून ते पापाराझींपर्यंत सर्वांची लाडकी आहे.
राहा कपूर तिच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. तिचा क्यूटनेस पाहून तर तिचा वेगळा चाहतावर्गही तयार झाला आहे. आता पुन्हा एकदा राहा कपूर चर्चेत आली आहे.
आलिया हिनं रणबीर कपूर आणि राहाचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीर आणि राहा दोघेही हात पकडून चालताना दिसत आहे. राहा ही पिवळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये अगदी क्यूट दिसतेय. तर रणबीरने टीशर्ट आणि व्हाईट शॉर्ट हा लूक कॅरी केलेला आहे. आलियाने या फोटोला “कॅप्शनची गरज नाही” असं कॅप्शन दिलं आहे.
या फोटोमध्ये दिसत असलेल्या बाप-लेकीच्या बॉन्डिंगवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीरने लेक राहाच्या नावाचा टॅटू काढला होता. टॅटू काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यातूनच अभिनेत्याचं आपल्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.