देवळगाव गुजरी परिसरात पंधरा दिवसांपासून विजेचा लपंनडाव नागरिक वैतागले

Khozmaster
3 Min Read
रस्ता रोकोचे आंदोलनचे कार्यकारी अभियंता सिल्लोड यांना दिले निवेदन; जोगेंद्रसिंह ठाकूर
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे महावितरण कंपनीचे ३३ केव्ही उपकेंद्र असून तब्बल चाळीस चे पन्नास हजार नागरिक सावळदबारा सबस्टेशनला वैतागले आहेत.देऊळगांव गुजरी व परीसरातील गावांमध्ये गेल्या १५ ते २० दिवसांपासुन लाईट नसल्याने जोगेंद्रसिंह राजेंद्रसिंह ठाकुर (नितु ठाकुर) रा. देऊळगांव गुजरी ता जामनेर यांनी सिल्लोड येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे रस्ता रोकोचे आंदोलनचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.रस्ता रोको आंदोलन मधे सहभागी झालेले गावे  देऊळगांव, पळासखेडे काकर, तोरनाळे, जुनोने, वसंतनगर, पठाड,ता जामनेर,सावळदबारा ,डाभा, मोलखेडा, हिवरी चारुतांडा नांदागाव देव्हारी, टिटवी, पळसखेडा, नांदा, तांडा तांडा ता सोयगाव येथील रहिवाशी नागरीक.नितू ठाकूर उपसरपंच देवळगाव गुजरी यांनी
उपरोक्त विषयान्वये विनंती की, मागील दि.२५/०५/२०२४ देऊळगांव व परीसरात जोरदार वादळ झालेले होते या वादळात परीसरातील अनेक ठिकाणी झाडे उनमळुन पडली व इले. खांब देखील पडलेले होते. त्यामुळे परीसरातील वीज पुरवठा खंडीत झालेला होता मात्र या घटनेला आज १८ दिवस उलटुन देखील परीसरातील वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही. परीसरात २४ तासांपैकी १ तास देखील नियमित लाईट सुरु राहत नाही. त्यामुळे नागरीक हैराण झालेले आहेत. गावात वीज उपलब्ध न झाल्यामुळे वेळेवर पाणी पुरवठा देखील होवु शकत नाही त्यामुळे गावातील नागरीक ग्रामपंचायतीवर धडक मोर्चे काढत आहेत. गावात वीज अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या विभागाकडून तात्काळ काम होणे बंधनकारक असतांना मात्र सदरचे काम संथ गतीने करण्यात येत आहे. आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते आम्हाला उडवाउडवीचे उत्तरे देऊन जाणिवपुर्वक टाळाटाळ करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आलेले आहे. देऊळगांव, पळासखेडे काकर, तोरनाळे, जुनोने, वसंतनगर, पठाड तांडा ही गावे जळगाव जिल्ह्यातील असुन जिल्ह्यातील शेवटचा भाग आहे. त्यामुळे या गावांना छ. संभाजीनगर मधील सावळदबारा ता. सोयगांव येथील सबस्टेशनवरुन वीज पुरवठा केला जातो. सदरचा वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. पुढील पाच दिवसात विजपुरवठा सुरळीत न झाल्यास वरील सर्व गावातील ग्रामस्थ आपल्या विभागाच्या विरोधात दि. २५/०६/२०२४ वार मंगळवार रोजी जिल्हा हद्द छ. संभाजीनगर रस्ता देऊळगांव गुजरी येथे रस्ता रोको आंदोलन करतील अशा कडक इशारा उपसरपंच जोगेंद्रसिंह ठाकूर यांनी दिला आहे.
तरी आमच्यावर आंदोलनाची वेळ न
येवु देता तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे पण लेखी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाद्वारे ची प्रत माहिती व कार्यवाहीसाठी सविनय सादर
माननीय श्री. अब्दुल सत्तार साओ, मंत्री, महाराष्ट्र राज्य,मा. जिल्हाधिकारी छ. संभाजी नगर,
मा. पोलिस निरीक्षक फर्दापूर व सोयगाव,एम.एस्सी. उपअभियंता सो, M.R.V.V.C.Ltd. उपविभाग निरज बिदे सोयगाव, एम.एस्सी. शाखा कनिष्ठ अभियंता सावळदबारा   यांना लेखी निवेदन देण्यात आले असल्याची माहिती उपसंपादक गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना दिली आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *