जामनेरचा निशांत तायडे नाशिक विभागात सर्वप्रथम ! इंग्रजीत मिळविले ९९ टक्के गुण

Khozmaster
1 Min Read
जामनेर विशेष प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर ( ता . १६ ) पहूर येथील केंद्रप्रमुख भानुदास  तायडे यांचा मुलगा निशांत तायडे याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ( इ . १० वी ) इंग्रजी विषयात १०० पैकी ९९ गुण घेऊन नाशिक विभागात प्रथम आला .
       मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला . यात पहुर केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांचा मुलगा निशांत भानुदास तायडे याने जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतले . त्याला इंग्रजी विषयात ९९% गुण मिळाले असून नाशिक विभागात तो अव्वल ठरला आहे .
वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस पदवी मिळवून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न आहे . निशांतच्या या उज्ज्वल यशाबद्दल  पालकांसह त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *