जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील शेत परिसरातील शेतकऱ्यांच्या सुरु असणाऱ्या चोऱ्या काही केल्या बंद होण्याचे नाव घेत नाही, पोलीस मात्र शेतकऱ्यांचा तक्रार अर्ज घेवून पंचनामा करण्याव्यतिरिक्त एकाही चोरीचा तपास लावण्यास किंवा चोरीचे सत्र बंद करण्यास सपशेल अपयशस्वी झालेले असल्याची चर्चा फत्तेपूरात आता सुरु झालेली आहे. इले. मोटारी चोरणारी टोळी सक्रीय झालेली असून दिवसे दिवस टोळी हिम्मत वाढतच असल्याने शेतकरी वर्गात भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या टोळीने पुन्हा दि.१० जून रोजी हिंगने-पिंप्री शिवारात एका शेतकऱ्यांचा इले, मोटार चोरून जणू पोलीसांना आव्हान दिलेले आहे. शेतकऱ्यांच्या चोरीचे सत्र असेच जर सुरु राहीले तर शेतकरी वैतागून रस्त्यां वरआत्याशिवाय राहणार नाही. असा इशारा अनेकांनी दिलेला आहे.येथील प्रकाश काशीनाथ फिरके यांचे गट नंबर ६०/१ शेत टाकळी पिंपरी शिवरात येते.या शेतातील विहिरीतून चोरट्यानी तीन एच पी इले. पाणबुडी मोटार दि.१० जुन रोजीच्या रात्री चोरून नेलेली आहे.याबाबतची तक्रार शेतक-याने येथील पोलीस स्टेशन ला दिलेली आहे. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. मात्र चोरीचा गुन्हा दाखल केलेला नाही. या अगोदर अनेक शेतकऱ्यांच्या पाणबुड्या चोरी झालेल्या आहेत. त्यापैकी एकाही शेतकन्यांची इले. मोटारीचा तपास लागलेला नाही. अनेकांनी तक्रारी अर्ज दिलेला तर काहींनी गुन्हा दाखल केलेले आहेत. तपास मात्र शुन्य आहे. येथील पोलीस यंत्रणा हतबल झाल्याची चर्चा सुरु आहे. या चोरीच्या सत्राला शेतकरी कंटाळले आहेत. वा अगोदर फत्तेपूर येथील रमेश नारायण तेली या शेतकऱ्याच्या गट नं. ३३८/१ गोद्री शिवारातील शेतातून तीन एच पी ची इले. पाणबुडी व किन्ही येथील प्रमोद भास्कर म्हस्की यांची पाच एच पी ची इले. पाण बुढी मोटार चोरी झालेली होती. दोघांनी रितसर चोरीचा गुन्हा दाखल केलेला होता. चोरीचा
तपास लागून आपली इले. पाणबुडी परत मिळेल या आशेवर शेतकरी होते. मात्र जुन महिना आला
तरी इले. पाण बुडी मिळत नसल्याने कंटाळून बातीत रमेश नारायाण तेली या शेतकन्याने नवीन तीन एचपीचा इले. पाणबुडी विकत घेवून विहीरीत
टाकलेला आहे. आणि आपण विहीरीत नवीन इले. पाणबुडी मोटार टाकलेली असल्याचा मेसेज सोशल मिडीयावर टाकून एक प्रकारे चोरांना सुचित केलेले आहे. यावरून लक्षात येते की येथील पोलीस यंत्रणा किती हतबल झालेली आहे. असे रमेश तेली बांनी मेसेज मधून जाहिर केलेले आहे. दिवसे दिवस चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आलेले आहे. चोरट्यांची ऐवढी हिम्मत कशी बादली. त्यांना कोणाचा धाक राहिला नाही का?या मागील कारणे शोधली पाहीजे असे मत मांडले जात आहे. त्यामुळे चोरीच्या सत्राला शेतकरी वैतागले आहेत. यास कोठेतरी आळा बसला पाहिजेत यामुळे असे दिसत पोलिस यंत्रणेचे शेतकऱ्यांच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.