डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झाली विद्यार्थ्यांची कोंडी, शाळेचं सत्र करावं लागलं रद्द

Khozmaster
2 Min Read

डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोेंडी होते. याचा नाहक त्रास नागरीकाना सहन करावा लागतो. या वाहतूक काेंडीमुळे डोंबिवलीतील विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.

वाहतूक काेंडीमुळे बुधवारी सकाळच्या सत्रातील मुलांना घेण्यासाठी बस वेळेवर परत न आल्याने शाळेने दुपारचे सत्र ५वी ते ८ वीचे वर्ग बंद करावे लागले. लोकमतने यासंदर्भात शाळा सुरू होण्यापूर्वीच वृत्त देऊन संबंधित यंत्रणांना अवगत केले होते, मात्र तरीही वाहतूक नियंत्रण विभाग, आरटीओ, महापालिका, एमएसआरडीसी या यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचा फटका विदयार्थ्यांना बसला. कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु आहे. या कामामुळे वाहन चालक, स्थानिक नागरीक, रुग्णवाहिका आणि शालेय बसला फटका सहन करावा लगत आहे. वाहतूक विभागाच्या शून्य नियोजनामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. कधी कधी अर्धा तासाच्या प्रवासाला एक ते दोन तास लागतात. या बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला होता.

मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी रस्ते सुरु करावा. अवजड वाहतूक अन्य रस्त्याने वळवा अशी मागणी केली होती. या मागणी दखल प्रशासनाने घेतलेली नाही. प्रशासन अद्याप जागे झालेले नाही. आत्ता तर कल्याण शीळ रस्त्याला लागून असलेल्या विद्या निकेतन शाळेला बुधवारी वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. ही शाळा तीन सत्रात चालते. एक आठ वाजताचे, दुसरे साडे दहाचे आणि पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरीता साडे बारा वाजताचे तिसरे सत्र आहे. बुधवारी वाहतूक कोंडीमुळे दुसऱ्या सत्रासाठी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी गेलेल्या बसेस परतल्या नाहीत. ठिकठिकाणी बसेस वाहतूक काेंडीत अडकल्या होत्या. या बसेस परतणार कधी आणि तिसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांना घेण्याकरीता जाणार कधी असा प्रश्न प्रशासनासमोर होता. शाळा प्रशासनाने तिसरे सत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. वाहतूक कोंडीमुळे शाळा प्रशासनाला आणि विद्यार्थ्यांना सुट्टी घ्यावी लागली. हे सत्र सुट्टीच्या दिवशी चालविले जाईल असे प्रशासनाने सांगितले. मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळेवर ही वेळ आली आहे.

वाहतूक कोंडीचे कारण सांगत डोंबिवली कल्याणकरांना सल्ला दिला आहे की, विविध कामांमुळे वाहतूक कोंडी होणारच. मात्र कल्याण डोंबिवलीकरांनी बेशिस्त वाहने चालविण्याची गरज नाही. ट्रॅफिक, आरटीओ, महापालिका यंत्रणा काहीच का करत नाहीत, सगळे आपापल्या विषयांत मश्गुल असतात, सामाजिक बांधिलकी आहे की नाही

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *