सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार म्हणून पसंती विठ्ठल बदर पाटील यांना

Khozmaster
4 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव सिल्लोड विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची चर्चा आहे. त्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघांतील इच्छुक आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख विठ्ठल बदर पाटील यांना पक्षाच्या वतीने पसंती दिली आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपप्रमुख विठ्ठलजी बदर पाटील हे सरकारी नोकरीत मुख्याध्यापक पदी होते त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन नौकरी सोडली व ते सर्व समाजाला सोबत घेऊन चालतात समाजासाठी कोणत्याही अडीअडचणीला खंबीर उभे असतात म्हणूनच त्यांना सोयगाव तालुक्यातील जनतेने त्यांना पसंती दिली आहे.त्यांनी सोयगाव
परिसरात चांगलीच कंबर कसली असल्याचे चित्र दिसत आहे.आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने त्यानां हि संधी मिळणार असल्यची चर्चा सिल्लोड सोयगाव तालुक्यातून आहे.त्यांनी
सोयगाव मतदारसंघातील विविध कार्यक्रमांत ‘भावी आमदार’ विठ्ठल बदर पाटील यांच्या नावाने मोठा जोर धरल्याचे दिसत असल्याचे माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोयगाव तालुका प्रमुख दिलीप मचे यांनी बोलताना मत व्यक्त केले आहे.तसेच  सिल्लोड सोयगाव शहरातील जाहिरात फलक, चारचाकी वाहने, रिक्षा यांच्यावर भावी आमदार म्हणून विठ्ठल बिदर पाटील यांचा फोटो ठळक उल्लेखासह झळकत आहे.शहरातील राजकारणात सुरुवातीपासून गावकी-भावकीचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपप्रमुख विठ्ठल बदर पाटील यांचा चांगलाच प्रभाव आहे. असून पक्षात मोठा दबदबा निर्माण केला आहे.गेल्या काही वर्षांत उद्योग-व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरितांचे प्रमाण वाढले आहे. साधारण ५० ते ६० टक्के नागरिक बाहेरगावाहून येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील मतांचे समीकरण सोयगाव सिल्लोड मधे बदलू लागले आहे. गेल्या दशक-दोन दशकभरात अनेकांनी शहरात स्थायिक होऊन उद्योग-व्यवसायांत भरारी घेतली आहे. आर्थिक सुबत्ता आणि जनसंपर्क वाढल्याने शिक्षणसम्राट, उद्योजक व व्यावसायिकांची नावे इच्छुक म्हणून पुढे येऊ लागली आहेत.विविध पक्षांच्या नगरसेवकांनाही विधानसभेवर निवडून जाण्याचे वेध लागले आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी दोन वर्षांपासून नगरपालिकेतील लाभाची पदे घेऊन आमदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरूही केली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपप्रमुख विठ्ठल बदर पाटील हे मतदारसंघातील घरोघरी जाऊन थेट मतदरांशी संवाद साधत आहे, नागरिकांच्या वैैयकितक अडचणींची सोडवणूक करणे, शाळा-कॉलेजच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहे. ज्येष्ठ नागरिक व महिला संघटनांच्या कार्यक्रमांना आर्थिक मदत, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. सोयगाव सिल्लोडचे समर्थकांनीही संयोजकांकडे भावी आमदार म्हणून विठ्ठल बदर पाटील जिल्हा उपप्रमुख  याचा नावाचा उल्लेखाचा आग्रह धरला जात आहे.विशेषत: वाढदिवसानिमित्ताने शहरातील मोक्याच्या ठिकाणी झळकणाºया होर्डिंग व जाहिरातफलकांवर स्वत:च्या फोटोमागे विधानभवनाच्या इमारतीचा फोटो दाखविण्याची तजवीज केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या मोटारींवर भावी आमदार म्हणून विठ्ठल बदर पाटील असा उल्लेख व फोटो दिसू लागले आहेत.  हे भावी आमदार दिसत आहेत. सोयगाव सिल्लोडचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत की आमची पसंती जिल्हा उपप्रमुख विठ्ठल बिदर पाटील यांनाच आहे.अन् लग्नाला हजेरीसध्या शहर आणि सोयगाव सिल्लोड परिसरातील विविध गावांच्या यात्रा सुरू आहेत. त्या ठिकाणी भावी आमदारांच्या स्वागताचे फलक झळकत आहेत. यात्रेतील कुस्ती, तमाशा व सांस्कृतिक कार्यक्रमांना या इच्छुकांकडून बक्षिसे जाहीर केली जात आहेत.सिलोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ मध्ये शिवसेना उपनेत्या शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सौ,सुषमा ताई अंधारे,धाडस संघटनेचे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षांचे उपनेते श्री शरद कोळी साहेब यानी बोलवून तालुक्यातील जनतेच्या हितासाठी मोठे कार्यक्रम आयोजित केले होते सवताहा त्यांच्या गावामध्ये श्री जंरागे पाटील याना बोलवून छञपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविला असे मोठे मोठे कार्यक्रम श्री विठ्ठलजी बदर पाटील साहेब मतदार संघ मध्ये कार्यक्रम आयोजित करत आहे त्याना सोयगाव तालुक्यातील जनतेची आमदार उमेदवार म्हणून पसंती आहे,असे दिलीप मचे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका प्रमुख जिल्हा संभाजीनगर यांनी बोलताना सांगितले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *