छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीचे संकट येते की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. यंदा या परिसरात सात जूनला पहिला पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांम ध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. या पावसावरच या परिसरात जवळपास अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन,मकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. मात्र ते बियाणे उगवून येण्याच्या अगोदरच थोड्या फार प्रमाणात सुरू असलेला पाऊस अचानक गायब झाला. त्यामुळे ते बियाणे उगवते किंवा नाही का सावळदबारा परिसरात मोलखेडा, हिवरी चारुतांडा नांदागाव देव्हारी टिटवी, पळसखेडा, नांदा तांडा, डाभा, देव्हारी दुबार पेरणीचे संकट येते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये या परिसरात निर्माण झाली आहे. अगोदरच काही शेतकऱ्यांनी यंदा महागडे बियाणे खते घेऊन कशी तरी पेरणी केली होती. अजून अनेक शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे. येत्या दोन-चार दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. दरवर्षी या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर धूळपेरणी करतात. मात्र यंदा जूनमध्येच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने पेरण्यांना सुरुवात केली होती. मात्र अचानक पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. आता शेतकऱ्यांना मोठ्या दम दार पावसाची अपेक्षा लागली आहे.