छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांच्या माध्यमातून महिलांना टू व्हीलर शिकविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून भोसरी परिसरातील ज्या महिलांना टू व्हीलर गाडी चालवता येत नाही, अशा महिलांना गाडी चालविणे शिकविण्यात येत आहे.
याबाबत बोलताना प्रियंका बारसे यांनी सांगितले की, गाडी चालवता येणे ही आज काळाची गरज आहे. मुलांना शाळेत सोडणे, क्लासला सोडणे, नोकरीला जाणे-येणे, भाजीपाला करिता बाजारात जाणे, डॉक्टरांकडे जाणे अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी किमान टू व्हीलर तरी येणे आज आवश्यक आहे आणि म्हणूनच महिलांना सक्षम करणे त्यांचा आत्मविश्वास वाढविणे या दृष्टिकोनातून आपण हे टू व्हीलर प्रशिक्षण केंद्राची आज सुरुवात केली आहे. हौस म्हणा वा गरज पण गाडीही यायलाच हवी, हा माझा अट्टाहास. गाडी चालवता आल्याने आत्मविश्वास वाढतो, हा माझा अनुभव आहे, असेही प्रियंका बारसे यांनी यावेळी सांगितले.