आज दिनांक २७ जून २०२४ रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बारी समाजाच्या मागण्या संदर्भात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले…!
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे…!
1)पावसाळी अधिवेशनात शासनाने जाहीर केलेले राष्ट्रसंत शिरोमणी श्री रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुर्जी अमरावती येथे निर्माण करण्यासंबंधीची कारवाई लवकरात लवकर करावी..!
2)बारी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी राष्ट्रसंत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ जाहीर करावे…!
3) बारी समाजाचे मुख्य पीक पानमळा,पानपिंपरी व मुसळी अशा औषधी पिकांना प्रोत्साहन देण्यासंबंधी लागवडीकरिता अनुदान देणे तसेच पिकविमा व संशोधन केंद्र उभे करून विशेष योजना लागू करावी…!
4) नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने बारी समाजाची पानमळी पानपिंपरी व इतर पिकांची प्रचंड नुकसान झाले त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी…!
या मुख्य मागण्यांसह निवेदन देण्यात आले, यावेळी या ठिकाणी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यासोबत राज्यातील बारी समाज मंडळाची सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
बारी समाजाच्या मुख्य मागण्यांसंदर्भात आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यामार्फत मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना देण्यात आलेले निवेदन…!
Leave a comment