पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पुणेवाडी येथे श्री भैरवनाथ प्रासादिक पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान समयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कुकडी डावा कालवा सल्लागार समिती सदस्य सुजित राव झावरे पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे यांच्या समवेत फुगडीचा आनंद लुटला व या दिंडीतील वारकऱ्यांसाठी रोख ११ हजार रुपयांची मदत व टोप्यांचे वाटप केले .
पुणेवाडी च्या श्री भैरवनाथ प्रासादिक पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान सुजितराव झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी देवकृपा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुजित राव झावरे पाटील यांच्या वतीने दिंडी साठी मदत म्हणुन ११ हजार रुपयांची देणगी तसेच वारकऱ्यांना टोपी वाटप करण्यात आले. त्यांनी आपल्या सुमधूर आवाजात भक्ती गीत सादर केल्याने येथील वातावरण भक्ती पूर्ण झाल्याने वारकरी ही आनंदीत झाले . त्यांनी वारकऱ्यां समवेत दिंडी सोहळ्या चा आनंद घेतला.
यावेळी पुणेवाडी चे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, मारूती रेपाळे, सुहास पुजारी, हभप रामचंद्र महाराज बोरुडे, संदीप औटी, तुषार सोनवणे, हभप ब्रम्हदेव महाराज ननावरे, हरिभाऊ रेपाळे, महादू मते, साहेबराव मते, भीमराव महाराज पोटे, बजरंग पोटे, वामन रेपाळे, शंकर गायकवाड, बन्सी रेपाळे, कान्हूर पठार भजनी मंडळ, विलास सोनावळे, भाऊसाहेब सागर, सबाजी वाळुंज, भास्कर गाडे, शोभा गाडे, लंका वाळुंज, आशा ठुबे, भाऊसाहेब भिमाजी सोनावळे, बबन नाथा बनकर, रमाजी पाटीलबा ठुबे, मीराताई महाराज वाघमारे, अलका ठुबे, मीराताई झावरे, किसन नवले, लिलाबाई रेपाळे, विठाबाई रेपाळे, मीराबाई पोटे, नंदाबाई लांडे, मंजुळा रेपाळे, किसन रेपाळे, सुदाम रेपाळे, उषा मंदिलकर, महेंद्र साळवे,शारदा मते,नंदा गायखे, महिला व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .
[ चौकट – जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कुकडी डावा कालवा सल्लागार समिती सदस्य असलेले सुजितराव झावरे पाटील व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत पुणेवाडी च्या या दिंडी सोहळ्यात सहभागी होवून त्यांनी आनंद लुटला व आपण ही या वारकरी संप्रदायाचा देणे लागतो , या भावनेतून हा पंढरपूरला विठूराया व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चाललेल्या दिंडी सोहळ्यासाठी फुल ना फुलाची पाकळी समजून आर्थिक मदत , ती ही रोख स्वरूपात केली व वारकरी पायी वारी जाणार असल्याने त्यांच्या डोक्यांच्या संरक्षणासाठी त्यांना टोप्यांचे ही वाटप केले , असे शहाणपण क्वचित राजकीय नेत्यांना सुचते , ते मात्र सुजितराव झावरे पाटलांनी वेळीच ओळखले , त्यांच्या या समय सुचकतेला मानाचा मुजरा . ]