पगार लाखांत अन् लाच हजारांत! मुंबईत भ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे दाखल

Khozmaster
1 Min Read

मुंबई : गेल्या सहा महिन्यांत राज्यभरात ३७० कारवायांमध्ये ५३५ जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. त्यात मुंबईतभ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

यामध्ये सापळा रचून केलेल्या कारवाईच्या १८ गुन्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये पगार लाखांमध्ये असलेले अधिकारीही हजारो रुपयांची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले आहेत.

भ्रष्टाचार आणि लाचखोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याबाबत राज्य सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात येते. मात्र, लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास त्यांना मुहूर्त मिळत नसल्याची धक्कादायक माहिती ‘एसीबी’च्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

लाचखोरीत महसूल विभाग नंबर वन –

लाचखोरीत महसूल विभागाची आघाडी असून, १११ प्रकरणांत १५१ जणांवर राज्यभरात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ७ ‘क्लास वन’ अधिकारीही ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले आहेत.

नाशिक आघाडीवर –

नाशिक विभागात सर्वाधिक ८३ कारवायांमध्ये १११ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ पुणे विभागात ७१ कारवायांमध्ये ११२ आरोपी जाळ्यात अडकले आहेत.

कुठल्या वर्गातील किती कर्मचारी?

१) एकूण प्रकरणे- ३७०

२) क्लास वन अधिकारी- ३३

३) क्लास टू अधिकारी – ५८

४) क्लास थ्री अधिकारी- २७३

५) क्लास फोर अधिकारी – २३

६) इतर लोकसेवक- ५०

७) खासगी व्यक्ती- ९८

८) एकूण- ५३५

कोणीही लाच मागत असेल, त्याबाबत ‘एसीबी’च्या १०६४ या हेल्पलाइनवर तक्रार करावी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *