कृषीदिनी वृक्षारोपण सोहळा संपन्न

Khozmaster
1 Min Read

ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय आंबे तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. यावेळी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अक्षरपण ही काळाची गरज आहे. या आशयाला अनुसरून महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांनी वृक्षारोपण संकल्पना राबवत.
निसर्गात समतोल राखण्यासाठी झाडांची महत्त्वाचे कार्य आहे. प्राणवायूची निर्मिती करणे कार्बनडाय-ऑक्साइड शोषण करून नैसर्गिक समतोल झाडामुळे राखला जातो. प्रत्येकाने वृक्षारोपण करावे अशा प्रकारची नैसर्गिक हिताचे उपदेश यावेळी कृषी कन्या निहारिका सिंह यांनी दिले.
यावेळी वृक्षारोपण करण्यासाठी कृषी कन्या तनया बनसोडे, साक्षी ढमढेरे, साईथी दालकृती, अक्षदा खराटे या कृषिकन्यांनी सहभाग नोंदवून वृक्षारोपणाचे काम यशस्वीरित्या पार पाडले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापकासह शिक्षक रुंद तसेच वृक्ष लागवड करण्यासाठी अनेक नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.

0 6 3 9 0 6
Users Today : 199
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *