नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड

Khozmaster
1 Min Read

लातूर : ‘नीट’मध्ये गुण वाढवून देताे म्हणून आपल्या विविध राज्यातील एजंटांच्या माध्यमातून गंगाधरने माेठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचे पुरावे सीबीआय तपासात हाती लागले आहेत. लातुरातील मध्यस्थामार्फत त्याने दाेन शिक्षकांसाेबत १६ लाखांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यातही गंगाधर आणि त्याच्या एजंटाचे नेटवर्क असल्याचा संशय तपास यंत्रणांचा आहे. हा आकडा आता वाढण्याची शक्यता सीबीआयने मंगळवारी वर्तविली.

सर, मुझे तमिळ आती हैं, हिंदी थोडासा समज आती हैं !

लातूर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर ताे म्हणाला, सर, मुझे तमिळ आती हैं… थाेडासा हिंदी समज आती है… यावर न्यायालयाने त्याच्याशी हिंदीतून संवाद साधला. यातून ताे आंध्र प्रदेशात वास्तव्याला असावा, असा अंदाज तपास यंत्रणांना आहे. गुन्ह्यातील एफआयरमध्ये तर त्याचा पत्ता दिल्ली दाखविण्यात आला आहे. या विसंगतीचा तपासही आता सीबीआय करत आहे.

सीबीआय काेठडीत गंगाधर ताेंड उघडणार…

लातूरसह बीड जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांच्या फसवणूक प्रकरणात मध्यस्थ असलेला इरण्णा काेनगलवार आणि दाेन जिल्हा परिषद शिक्षकाच्या संपर्कात असलेला म्हाेरक्या गंगाधरची सीबीआयने दाेन दिवसांची काेठडी मंजूर करून घेतली आहे. आता या काेठडीत गंगाधर ताेंड उघडल्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यातील एजंटांचा शाेध लागणार असून, प्रकरणाची व्याप्तीही समाेर येण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *