रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू

Khozmaster
2 Min Read

ल्याण- ठाणे रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेस पडताना तोल जाऊन पडल्याने अफजल फकीरा शेख (४५) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शेख हे कल्याणचे रहिवासी होते. व्यवसायाने ते वास्तूविशारद होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अपघातीमृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

काल मुंबई आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे ठाणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी कल्याण ते ठाणे आणि कर्जत ते ठाणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. गाड्या उशिराने धावत होता. कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात राहणारे वास्तूविशारद अफजल फकीरा शेख (४५) काही महत्वाच्या कामानिमित्त वाशीला जाण्यासाठी निघाले. ते वाशीला गेले. त्याठिकाणी काम आटोपून शेख हे कल्याणच्या घरी येण्यासाठी वाशीहून निघाले. त्यांनी वाशीहून रेल्वे गाडी पकडली. ते ठाणे स्थानकात आले. ठाणे स्थानकात अमरावती एक्सप्रेसआली होती. त्यांनी त्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा तोल गेल्याने ते फलाट आणि गाडीच्या ग’पमध्ये पडले. ही घटना रात्री नऊ वाजता घडली. जखमी झालेल्या शेख यांना उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अवघ्या अर्ध्या तासातच शेख यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. शेख यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांचा मुलगा एमपीएससीची परिक्षा देण्याची तयारी करीत आहे. एक मुलीने फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. दुसरी मुलगी इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत आहे. शेख यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. शेख हे व्यवसायाने वास्तूविशारद असले तरी त्यांनी महाराष्ट्रतील दुष्काळग्रस्त भागात जाऊन अनेकांना मदतीचा हात देण्याचे काम केले होते. त्याचबरोबर मुस्लिम समाजाची मुले एखाद्या गुन्ह्याखाली तरुंगात गेल्यावर त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देण्याचे ही काम त्यांनी केले होते.

0 6 2 5 5 5
Users Today : 191
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *