पालघर : सौरभ कामडी
आज जग खूप पुढं गेलेले आहेत आपण ग्रामीण भागात आहोत कसलीही क्लास नाही खासगी शाळा नाही मात्र तरीही आपली मुल दैदिप्यमान यश संपादन करीत आहेत मात्र हीच हुशारी अधिक प्रभावी व्हावी यासाठी आपल्यातला लाजरा बुजरा स्वभाव आपल्याला बाजूला ठेवावा लागेल.विद्यार्थ्यांना भिडस्त व्हा प्रत्येक वेळी आपल्याला प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, प्रश्न विचारायला शिका बोलायला शिका तेंव्हाच तुम्ही या युगात टिकू शकाल अन्यथा कागदावरची हुशारी कागदावर राहील असे मत मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले आदिवासी हक्क विकास संघर्ष समिती आणि मोखाडा तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा तालुक्यातील गभालापाडा आश्रमशाळा येथे हा कार्यक्रम साजरा झाला.
वाघ यांनी पुढे सांगितले की, मी सुद्धा लहानपणी अभ्यासात हुशार नव्हतो मात्र भाषण करायला बोलायला हुशार होतो त्यामुळे शालेय वयापासून मला भाषणाची आवड निर्माण झाली शालेय वयातच नाही तर आज शिवसेनेच्या वकृत्व स्पर्धेत सुध्दा मी प्रथम क्रमांक मिळविला सांगायचा उद्देश हा की याच कलेच्या जोरावर आज मी राजकारणात सक्रीय आहे यामुळे मुलांनो बोलायला शिका, तुम्ही कोणत्याच क्षेत्रात मागे राहणार नाही, यावेळी पत्रकार हनिफ शेख यांनी आपल्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगा जागतिक दुःख न बाळगता आपल्या वडिलांचे घामानं मेहनतीने पिळदार बनलेले शरीर बघा याजगात सर्वात सुंदर आपली आई आहे तिच्याकडे बघा. या वयात वाचन अतिशय महत्त्वाचे आहे छत्रपती संभाजी राजेंनी सुध्दा वयाच्या ३२ व्या वर्षी बुधशासन नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या व्यक्तीला लहानपणी शाळेत बसू दिले जात नव्हते ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकराणी घटना लिहिली असे अनेक आदर्श आज आपल्या समोर आहेत. आपल्या आयुष्यात काहीच चांगलं नाही करता आलं तरी एक चांगला माणूस व्हा असे आवाहन शेख यांनी केले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष मंगेश दाते यांनी समाजात प्रचंड श्रीमंत लोक आहेत मात्र आपल्या मुलांना कोणीतरी प्रौत्साहान दिले पाहिजे त्यांच्यासाठी कोणीतरी काहीतरी केले पाहिजे यासाठी ही संघर्ष समिती काम करीत असून याबद्दल वाघ यानाचे मानावे तेवढे आभार कमी असल्याचे सांगितले
तर पाचघर ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र येले यांनी मेहनत केल्याने सर्व स्वप्ने पूर्ण होतात मी सुद्धा एवढ्या कमी वयात सरपंच झालो असे सांगितले.
तर प्राचार्य अर्जुन शेळके यांनी १२ वी नंतरच्या तांत्रिक अडचणी बाबत मार्गदर्शन केले त्यानी यावेळी स्वतः चां संघर्ष सांगत त्यानी मार्गदर्शन केले.यावेळी समितीचे सदस्य निलेश झुगरे,उपसरपंच नंदकुमार वाघ, भारत बुधर आदी उपस्सूथित होते यावेळी तब्बल ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्रसंचालन जगदाळे सर यांनी केले.
विद्यार्थ्यांना भिडस्त व्हा, तरच भविष्य सुखकर उपसभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले मनोगत आदिवासी हक्क संघर्ष समिती कडून गुणवंतांचा सत्कार
0
6
2
5
7
0
Users Today : 206
Leave a comment