भरधाव मालवाहू मिनीट्रकने चिरडले, एका शिक्षकाचा जागीच मृत्यू

Khozmaster
1 Min Read

खामगाव: भरधाव मालवाहू मिनीट्रकने चिरडल्याने एक शिक्षक जागीच ठार झाला. तर त्यांचा सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान खामगाव-पिंपळगाव राजा रस्त्यावर घडली.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवर कार्यरत असलेले दोन शिक्षक सकाळी शाळेवर जाण्यासाठी एमएच २८ एएच २०३४ या दुचाकीने निघाले. दरम्यान, विरूध्द दिशेने येणाऱ्या एमएच १७ टी ४६३८ या क्रमांकाच्या भरधाव मिनीट्रकने खामगाव-पिंपळगाव राजा रस्त्यावरील एका स्टाईलच्या दुकानासमोर दुचाकीला समोरा समोर जबर धडक दिली. यात चिरडल्या गेल्याने इरफान शहा लुकमान शहा नामक शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तर त्यांचे सहकारी शिक्षक रफीउद्दीन शहाउद्दीन गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी शिक्षकाला खामगाव येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला. या घटनेमुळे मृतकाच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच मृतकाचे नातेवाईक मोठ्या संख्येने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *