स्वप्निल कुसळेने मराठी माणसाचा अभिमान वाढविला – चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कौतुक
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळे यांने नेमबाजीमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकाविले. त्यांच्या या कामगिरीचा सर्व भारतीयांना व विशेषतः मराठी माणसांना खूप अभिमान आहे, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले.
त्यांनी एक्स समाजमाध्यमावर पोस्ट करीत स्वप्नीलचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. श्री बावनकुळे म्हणाले, 1952 मध्ये महाराष्ट्रातून कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर थेट 2024 मध्ये स्वप्निल च्या रूपाने पुन्हा एकदा एका मराठी माणसाने ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावले आहे. स्वप्निल कुसळे यांच्या या कामगिरीतून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक तरुण प्रेरणा घेतील.
Users Today : 38