मोताळा तालुक्यातील दाभा, तांडा नाईक नगर व पंचक्रोशीतील पाणी प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक संपन्न..!

KHOZ MASTER
1 Min Read

आज दाभा, तांडा नाईक नगर तसेच पंचक्रोशीतील गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येसंदर्भात माझ्या नेतृत्वात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

तसेच गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ पाणी टँकरची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीदरम्यान ग्रामस्थ, माता-भगिनी यांनी पाणीपुरवठा, रस्ते, नाली व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत विविध समस्या मांडल्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी विधानसभा समन्वयक श्री. गणेशसिंग राजपूत, श्री. नागापुरे साहेब (कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलढाणा), श्री. काळे साहेब (गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोताळा), श्री. परळकर साहेब (उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा मोताळा), ठाणेदार साहेब, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, श्री. शेवाळे मामा, श्री. ज्ञानेश्वर वाघ, श्री. सचीन हिरोळे यांच्यासह ग्रामस्थ व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

#पाणीप्रश्न #दाभा #buldhana #shivsena #sanjaygaikwad

0 9 7 3 6 9
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *