ठाकरे – फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी – रामदास आठवले

Khozmaster
2 Min Read

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वर्सेस देवेंद्र फडणवीस वाद सुरू आहे. राजकारणात विरोधक देखील असतात. माझी दोघांनाही विनंती आहे. दोघांनाही राजकारणात राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोडले असं नाहीये.

मला वाटतंय राजकारणात दोघेही राहतील. उद्धव ठाकरेंनी मनातील चीड काढून टाकावी. पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र यांच्यातील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी आहे असे विधान केंद्रीय समजकल्याण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) व्यक्त केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समिती पुणे यांच्यातर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी केद्रीय समाजकल्याण मंत्री आठवले यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी समाज माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष आनंदाची बाब

भाजपच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत आठवले म्हणाले, महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे.त्या सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने नितीन गडकरींचा नंबर लागला होता. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विचार होतोय. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर आनंदाची गोष्ट आहे.

अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ ची मागणी

लोकशाही अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असून, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *