जनतेचा पैसा जनतेकडे जातोय, तुमचं पोट का दुखतयं!•- चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
• महाविकास आघाडी म्हणजे भंगार कंपनी
नागपूर, 4 ऑगस्ट 24 ,लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जनतेचा पैसा जनतेकडे जातोय. हा पैसा उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत यांच्या घरातून जाणार नाहीच. मग, तुमचं पोट का दुखतयं, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. कितीही पैसे लागले तरी सरकारने मागे पाहू नये, असे त्यांनी स्पष्ट केले
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोप करण्याऐवजी नार्को टेस्टला तयार असल्याचे जाहीर करावे, असे सांगून बावनकुळे म्हणाले,सचिन वाझे खोटं बोलत असेल तर जनतेला नार्को टेस्टमधून सत्य कळू द्यावे. अनिल देशमुख यांनी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चौकशीला समोर जावे. मविआचे सरकार येणार असे नाना पटोले यांना वाटत असेल तर ते ‘मुंगेरीलाल” झाले आहेत. महाविकास आघाडी ही भंगार कंपनी आहे. जनतेला माहीत आहे की, राज्यात डबल इंजन सरकार येते आहे.
• पागलखाना हॉस्पिटलमध्ये भरती करू!
औरंगजेबीवृत्तीत आलेले उध्दव ठाकरे हे धर्माचा आधार घेऊन मताचे राजकारण करू लागले आहे. त्यांना मानसिक आजार झालेला आहे नागपुरातील पागलखाना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. सकाळी वाजणारा टेप रेकॉर्डर विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवा. उद्धव ठाकरे यांनी पुढचं भाषण विकासावर करून दाखवावे, असे आव्हान श्री बावनकुळे यांनी दिले.
Users Today : 38