ऑलिम्पिकवरुन परत येताच मनू भाकरने पाहिला ‘हा’ सिनेमा; हिरोबद्दल म्हणाली, ‘याला मेडल मिळायला हवं…’

Khozmaster
2 Min Read

यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हरियाणाच्या २२ वर्षीय मनू भाकरने (Manu Bhaker) इतिहास रचला. शूटिंगमध्ये तिने दोन कास्य पदक पटकावले. मनूच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशवासियांना तिचा अभिमान वाटत आहे.

ऑलिम्पिकवरुन परत येताच मनूने कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमा पाहिला. तिला हा सिनेमा अनेक दिवसांपासून पाहायचा होता. हा सिनेमा पाहून तिने सोशल मीडि्या पोस्ट करत कार्तिकचं कार्तिकचं भरभरुन कौतुक केलं. कार्तिकनेही तिला यावर रिप्लाय दिला.

मनू भाकरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यात ती खुर्चीवर बसून टीव्हीवर कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ पाहताना दिसत आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ” अखेर ऑलिम्पिक संपलं आहे आणि घरी पोहोचताच मी चंदू चॅम्पियन पाहिला. हा सिनेमा जितका मला रिलेटेबल वाटला होता त्याहून जास्त निघाला. सराव, स्ट्रगल, अपयश पण कधीच हार न मानणं. ही भूमिका इतक्या सहजतेने केल्याबद्दल कार्तिक आर्यनचं कौतुक. एक अॅथलीट म्हणून मला माहितीये हे सोपं नाही..विशेषत: तो सरावाचा सीक्वेन्स..यासाठी तुला मेडल मिळायला हवं.”

मनू भाकरची पोस्ट पाहून कार्तिकही खूश झाला. त्याने तिची पोस्ट रिपोस्ट करत लिहिले, ‘थँक्यू मनू. तुझ्यासारखी खरी चॅम्पियन जेव्हा स्तुती करते हा क्षण मी नेहमी आनंदाने आठवेन. आम्ही भारतीयांना तुझा अभिमान वाटतो. चंदू चॅम्पियनकडून खूप प्रेम आणि आभार.”‘चंदू चॅम्पियन’ ही भारताचे पहिले पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकरची गोष्ट आहे. सिनेमात त्यांचा स्ट्रगल दाखवण्यात आला आहे आणि त्यांनी कशाप्रकारे देशाचं सुवर्ण पदकाचं स्वप्न पूर्ण केलं हे दाखवलं आहे. 140 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 88 कोटींची कमाई केली.

0 8 9 4 5 5
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *