पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात संशयित घुसले; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Khozmaster
1 Min Read

पुणे : पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे संशयित घुसले आहे. ते पोलिसांनी बंद केले आहे. सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. मोठा गोंधळ सुरू झाला आहे.

पोलिसांनी त्या तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

काल काही लोक त्या ठिकाणी आले होते. त्यांचे फोटो काढले होते. संबंधित लोक आज पुन्हा रुग्णालय परिसरात आल्यावर कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडून ठेवण्यात आले. आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले अशी माहिती सुरक्षारक्षकांनी दिली आहे.

 

 

काल एक फोटो मोबाइलवर व्हायरल झाला होता. त्यावरून आम्हाला त्यांच्यावर संशय आला. ते काल ब्लड टेस्ट करायला आले होते. तसेच काल रुग्णालयाबाहेर जाऊन फोटो काढून गेले. आम्हाला हे फारच संशयास्पद वाटलं. आज पुन्हा त्यांना आम्ही पाहिलं. मग त्यांना आम्ही रुग्णालयात स्थानबद्ध करून ठेवले. आम्ही कालपासून त्यांच्यावर नजर ठेवून होतो. आज पण ते ब्लड टेस्ट करायला आले. आम्ही लगेच त्यांना पकडून ठेवले. त्यांच्या बॅगमध्ये बिहारचे आधार कार्ड होते. तातडीने वरिष्ठांना कळवले. तसेच पोलिसांना फोन करून बोलावले. यावेळी आम्ही लोकांना बाहेर काढले. त्यांची वेशभूषा अफगाणी होती. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. पण आम्ही नागरिकांची, रुग्णांची सुरक्षा म्हणून तातडीने पाऊल उचलून रुग्णालय बंद केले असल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *