छत्रपती संभाजीनगर : श्रावणाला सुरुवात होताच सर्वांना लाडक्या बाप्पांच्या आगमनाचेही वेध लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आता तयारीला लागले आहेत. त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी यंदा शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, राज्यातील प्रथम विजेत्या गणेश मंडळाला ५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे. कोणते सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी होऊ शकते नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे. निकष काय असणार १) सार्वजनिक गणेश मंडळाकडून सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन. २) संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी राबविण्यात आलेले उपक्रम. ३) गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारके यांचे जतन व संवर्धन. ४) धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन. ५) विविध सामाजिक उपक्रम व कार्य. ६) पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट. ७) ध्वनिप्रदूषणरहित वातावरण. निकषांच्या आधारे परीक्षण गणेशभक्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि तसेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक राबवले जावेत, म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाणार आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे. असे मिळतील पुरस्कार राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळास ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाला २ लाख ५० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला १ लाख रुपयांचे पारितोषक व प्रमाणपत्र, जिल्हास्तरावर प्रथम विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख कधी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. कोण करणार परीक्षण गणेशोत्सवाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होत आहे. यानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या परीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक जिल्हास्तरीय समिती गठित केली जाईल. ही समिती जिल्ह्यातील मंडळांना भेट देऊन त्यांचे परीक्षण करेल.

Khozmaster
1 Min Read

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी रखडलेल्या कामांबाबत महापालिकेत धाव घेतली. पालिका मुख्यालयात आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांनी कैफियत मांडली.

पालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपला. तेव्हापासून निवडणूक झालेली नाही. सगळा कारभार प्रशासन चालवत आहे. लोढा यांनी पालिका आयुक्तांसमवेत पक्षाच्या माजी नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली. पालिका प्रशासन व लोकांच्या समस्या याबाबत समन्वय साधण्यासाठी बैठक घेतल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

बैठकीत मुंबईतील शौचालय दुरुस्ती अथवा पुन:र्बांधणीबाबत होणारा विलंब, काही ठिकाणी कार्यरत न झालेला आपला दवाखाना, उद्यानांचे सुशोभीकरण, बंद रुग्णालये, प्रसूतिगृहे, रस्त्यांची कामे, खड्डे, आदींवर चर्चा झाली.

सहायक आयुक्तांचा व्हीसीद्वारे सहभाग-

१) २४ वॉर्डांतील सहायक आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)द्वारे बैठकीत सहभागी झाले होते. विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश लोढा यांनी प्रशासनाला दिले.

२) बैठकीस भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, कमलेश यादव, अभिजित सामंत, राजेश्री शिरवडकर, बिंदू त्रिवेदी, दीपक तावडे, आदी ज्येष्ठ नगरसेवकांसह एकूण ६० नगरसेवक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवकही गाऱ्हाणी मांडण्यासाठी पालिकेत आले होते.

0 6 6 1 6 2
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *