पुणे: मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात संधर्ष निर्माण झाला आहे. मारत आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीही सुरु आहे. तसेच त्यांनी सरकारला २९ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे.
तर दुसऱ्या बाजूने ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) लढत आहेत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. त्याला विरोध करत हाके मैदानात उतरले आहेत. आज हाकेंनी आरक्षणाच्या मुद्दावरून थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले आहेत. पवारांनी पडद्या मागून जरांगेना पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे.
हाके म्हणाले, शरद पवार म्हणतायेत कि सर्वपक्षीय बैठक बोलवा. आतापर्यंत ८ महिने झाले. ओबीसी मराठा परिस्थिती खराब झाली आहे. मग तेव्हा ते गप्प का बसले? मुख्यमंत्री बैठकीला तूम्ही का गेला नाहीत? तरीही स्वागत आहे. आम्ही बैठकीला जाऊ, आमची आम्ही कायदेशीर भाषा तिकडं बोलू. पडद्यामागून पवार यांनीच जरांगेना उद्युक्त केले. इतके दिवस गप्प का होते. ओबीसी प्रश्नांवर बोलावे असे हाके म्हणाले आहेत.
हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी आंदोलन केले होते. त्यांना आश्वासन ं दिली होती त्याचे काय झाले? जरांगेच्या शांतता रँलीला आक्षेप आहे. त्यात अशांतता निर्माण कोणी केली. शांतता रँलीला शाळा का बंद केल्या जातात. कायदा सुव्यवस्था पाळू शकत नाही का? सांगा मुख्यमंत्री लाखो हरकती घेतल्या कुणबीवर त्याचे काय झाले तेही सांगा असे हाके यांनी विचारले आहे. ओबीसी आरक्षणाला डोळ्यासमोर ठेवून अस्वस्थता निर्माण करणार का सरकार? शांतता रँलीत ३०ते ३५ वेळा आम्ही क्षत्रिय आहोत, मराठ्यांची अवलाद आहोत असे म्हटले. ही वर्चस्वाची भावना आहे. यामुळे इतर जणांमध्ये असुरक्षितता निर्माण होते.
आम्हाला पाठिंबा नाही, जरांगेंना मात्र पाठिंबा
मुख्यमंत्री त्यांना तरीही रेड कार्पेट देत आहेतका? आम्ही आरक्षण घेतो, आम्ही खालच्या वर्णात आहोत ही चूक आहे का? न्यूनगंडाची भावना निर्माण झालीय. हक्क आणि अधिकार याची आम्हालाही माहिती आहे. आम्ही जाब विचारू निवडणूकीत उमेदवारांना. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे. अशीच सर्व ओबीसींची भावना आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ३ वर्षे झाली. आरक्षण संपवायचा असा यामागचा विचार आहे. गावांमध्ये आमदार, पक्षांच्या ओबीसी सेलचे पदाधिकारी आम्हाला आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत. जरांगेंना मात्र आमदार पाठिंबा, खर्च करून देत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या विरोधातच काम सुरू मग कुठे आहे सामाजिक न्याय? असा सवाल हाकेंनी उपस्थित केला आहे.
जरांगे जातीयता मानणारे आहेत
जरांगे विधानसभेची एकही निवडणूक लढणार नाहीत. लढाव्यात त्यांनी २८८ मतदार संघ ते लोकशाही मानणार नाहीत. छत्रपतींच्या पुतळ्यासमोर बसतात, शिवीगाळ करतात. ९६ कुळी मराठे हा लोकशाहीत सांगायचा, यावर निवडणूक लढण्याचा विषय आहे का? ते जातीयता मानणारे आहेत नेता नाहीत असे हाके यांनी सांगितले आहे.