*रक्षाबंधनाच्या पर्वावर लाडक्या बहिणींचा देवाभाऊंशी संवाद*
* प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
* लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अभियान
रक्षाबंधनाच्या दिवशी 18 ऑगस्टला ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या भाजपाच्या उपक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील माता-भगिणींशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
श्री बावनकुळे यांनी एक पत्राद्वारे या उपक्रमाची माहिती दिली तसेच समाजमाध्यमावरून आवाहन केले आहे. श्री बावनकुळे म्हणाले की, महिला सक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार व विशेषतः भारतीय जनता पार्टी मेहनत घेत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचाही नारीशक्ती वंदन हाच ध्यास असल्याने माझी लाडकी बहीण योजना त्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सुरू केली आहे. भाजपा महिला मोर्चाने या उपक्रमाची जबाबदारी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Users Today : 40