“देवाभाऊ… तुम्ही पाठवलेल्या तीन हजार रुपयांमुळे मला खूप मोठा आधार मिळाला! तुमच्या या उपकारांची परतफेड मी कशी करू?!”

KHOZ MASTER
1 Min Read

“देवाभाऊ… तुम्ही पाठवलेल्या तीन हजार रुपयांमुळे मला खूप मोठा आधार मिळाला! तुमच्या या उपकारांची परतफेड मी कशी करू?!”

‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमात काटोलच्या एका भगिनीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी थेट बोलताना काढलेले उद्गार हे महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पोचपावती आहेत.

राज्यातील अनेक भागात दुर्दैवाने आजही दिवस-रात्र कष्ट उपसून देखील अनेक माता भगिनींच्या हातात पैसे येत नाहीत. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.

आत्तापर्यंत अनेकांनी या माता – भगिनी, माय – माऊलींना खटाखट पैसे देण्याचे खोटी आश्वासने देऊन त्यांची थट्टा केली. त्यामुळे महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर पूर्व अनुभवामुळे ती जाहिरातबाजी आहे, अशी महिलांची समजूत होणे स्वाभाविक होते. परंतु, रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून महायुती सरकारने सामान्य माता – भगिनींचा यंत्रणेवरचा व राजकारण्यांवरचा विश्वासच जणू परत आणला आहे.

0 9 7 3 8 1
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *