जिल्हा न्यायालय मेहकर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी

Khozmaster
1 Min Read

सतीश मवाळ

 

मेहकर दिनांक 2 अक्टोबर 2022 रोजी मेहकर तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा न्यायालय मेहकर येथे महात्मा गांधी जयंतीचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. त्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन-चारित्र्यावर प्रकाश टाकला या प्रसंगी मा.सतिष एम.चंदगडे जिल्हा न्यायाधीश -१, मा.अ. अ. शेख दिवाणी न्यायाधीश, मा. जितेंद्र एन. जाधव दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) मेहकर तसेच तालुका विधी सेवा समिती मेहकर सामाजिक कार्यकर्ते सदस्य समाधान पदमणे व तालुका वकील संघाचे सचिव श्री विजय एम. बाहेकर, उपाध्यक्ष राहुल ग. तुपे तसेच वकील मंडळी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गजानन एस.जाधव( बजावणी अमलदार जिल्हा न्यायालय मेहकर ) यांनी केले व आभार प्रदर्शन गजानन व्ही. काळे( नाझर जिल्हा न्यायालय मेहकर ) यांनी मानले तसेच न्यायालयीन कर्मचारी ए.ए.गुजर, पांडुरंग एन. मुंडकुडे, सतिष के. काकडे, अमोल पी. शिंदे, सचिन चरखे, ज्ञानेश्वर एन. चव्हाण यांचेसह इतर अनेक असंख्य न्यायालयीन कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 4 5 9 0
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *