मुलीचा लैंगिक छळ काढणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून नागरिकांनी काढली धिंड

Khozmaster
2 Min Read

नालासोपारा :- खासगी ट्युशन क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप देऊन नागरिकांनी धिंड काढल्याची घटना बुधवारी सकाळी विरारच्या मनवेलपाडा परिसरात घडली आहे.

विरार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मनवेल पाड्याच्या सह्याद्री नगरमध्ये आरोपी शिक्षक प्रमोद मौर्या हा इशांत नावाचा खासगी ट्युशन क्लास चालवतो. यामध्ये त्याने ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा मागील आठवड्यात लैंगिक छळ केल्याने ती घाबरून २ दिवस ट्युशनला गेली नाही. तिला घरच्यांनी ट्युशनला का जात नाही हे विचारल्यावर तिने घरच्यांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर बुधवारी सकाळी मुलीचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक ट्युशनमध्ये गेले व आरोपी शिक्षकाला मारहाण करून भर रस्त्यावरून त्याची धिंड काढली. या झालेल्या मारहाणीत आरोपी शिक्षक हा रक्तबंबाळ झाला होता. या शिक्षकाने ३ ते ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

ज्या मुलींचा या आरोपी शिक्षकाने लैंगिक छळ केला आहे त्या मुली घाबरतात. याची पोलिसांनी चौकशी करून आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आरती पडवळ या स्थानिक महिलेने केली आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. मुलांना शिक्षकांकडे शिकविण्यासाठी विश्वासने पाठवतो परंतु ते असा घृणास्पद प्रकार करत आहे. हा नागरिकांच्या संतपाचा उद्रेक होता. त्याला बेदम मारहाण करत धिंड काढल्याचे मनिष राऊत यांनी सांगितले.

नागरिकांनी आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याने मुलीची छेड काढून लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिचा जबाब नोंदवत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *