पातूर तालुक्यातील चित्र : शेतकरी हवालदिल
पिंपळखुटा : पावसाळा सुरू झाला तेव्हापासून पावसाची दमदार हजेरी सुरूच आहे. मात्र गेल्या तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने पिकांना जबर फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हंगाम पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून अस्मानी संकटामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी बँक व सावकाराकडून कर्ज काढून विविध पिकांची पेरणी केली आहे. मात्र सतत पाऊस सुरू असल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.याकडे संबंधित महसूल विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी पातुर तालुक्यातील शेतकऱ्याकडून
कर्जाची परतफेड करायची कशी ?
पिकांच्या पेरणीसाठी काढलेल्या थकीत कर्जाची परतफेड होईल या आशेवर शेतकऱ्यांनी यंदाही बँक व सावकाराकडून कर्ज घेऊन विविध पिकांची पेरणी केली परंतु मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आल्याने मागील कर्जाची परतफेड करायची कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया
पावसाळा सुरू झाला तेव्हापासून सतत पाऊस सुरू आहे. तसेच गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आल्याने यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर पुन्हा वाढणार असल्याचे चित्र आहे.
प्रमोद हरमकार
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे.सोयाबीन, तूर ,कपाशी हे मुख्य पिके आहेत तरी या पिकाचे पावसा मुळे भरपूर नुकसान झाले आहे.तरी शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टी जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी
सौरभ दय्या शेतकरी