बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदार संघात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. तर २३ नोव्हेंबर रोजी मत मोजणी झाली. यामध्ये सुरुवाती पासुन शिंदेसेना गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांनी आघाडी घेत अटीतटीच्या लढतीत अखरे विजय मिळविला आहे. सकाळी ८ वाजेपासून मत मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये बुलडाणा मतदार संघात घाटाखाली आणि घाटावर असे दोन भागात हा मतदार संघ विभागाला गेला असून यामध्ये काटे की टक्कर ही बुलडाणा मतदार संघात पहायला मिळाली. महायुती शिंदेसेनेचे संजय गायकवाड तर महाविकास आघाडीच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जयश्रीताई शेळके यांच्यात ही लढाई झाली. मत मोजणीला सुरुवात झाल्यापासून संजय गायकवाड यांचा विजयाचा मार्ग मोकळा होत असतांना दिसून आला. अखेर त्यांनी ८४१ मताची आघाडी घेत आखरी फेरीमध्ये विजय मिळविला.
उध्दव ठाकरे यांनी बुलडाणा विधानसभेसाठी जयश्रीताई शेळके महिला नेतृत्व दिल्याने एक चांगला रंगत पहायला मिळाली. मात्र खेर विकासकामे, त्यांची वाढती लोकप्रियतेने संजय गायकवाड यांनी त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. पुन्हा एकदा बुलडाणा विधानसभेसाठी संजय गायकवाड यांच्या रुपाने आमदार म्हणून लाभले आहे. या विजयाचा जल्लोष महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी बुलडाणा शहरात केला. यात लाडक्या बहिणी देखील मागे नव्हत्या. त्यांनी देखील नाचून आमदार संजय गायकवाड यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.
Users Today : 21