हुरुन इंडिया २०२४ च्या रिच लिस्टमध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) पहिल्या क्रमांकावर होता. आता फॉर्च्युन इंडियाने फायनॅन्शियल इयर २०२३-२४ मध्ये सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे.
यातही शाहरुख खानचंच नाव पहिल्या क्रमांकावर आहे. शाहरुखने यावर्षी भरलेल्या टॅक्सची किंमत ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. शिवाय या यादीत सलमान खानपासून अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.
शाहरुख खानने २०२३ मध्ये लागोपाठ ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’ असे तीन ब्लॉकबस्टर हिट दिले. या तीनही सिनेमांची कमाई कोटीच्या घरात होती. शाहरुखचीही यामध्ये चांदी झाली. म्हणूनच शाहरुख टॉप टॅक्स पेयर सेलिब्रिटी बनला आहे. फक्त सिनेमाच नाही तर ब्रँड व्हेंचर्स आणि बिझनेसमधून होणारी कमाईही यामध्ये आहे. रिपोर्टनुसार, शाहरुखने तब्बल ९२ कोटी रुपये टॅक्स भरला आहे. जर टॅक्सच एवढा असेल तर त्याची एकूण कमाई किती झाली असेल याची कल्पनाही करता येणार नाही.
शाहरुखनंतर साऊथ सुपरस्टार थलपति विजयने सर्वात जास्त टॅक्स भरला आहे. त्याने भरलेल्या टॅक्सची रक्कम ८० कोटी रुपये आहे. यानंतर सलमान खान तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ७५ कोटी टॅक्स भरला आहे. तर बिग बी अमिताभ बच्चन हे ७१ कोटी रुपये टॅक्स भरुन चौथ्या क्रमांकावर आहेत. पाचव्या क्रमांकावर विराट कोहली आहे ज्याने ६६ कोटी टॅक्स भरला आहे. या नंतर अजय देवगण, रणबीर कपूर, हृतिक रोशन, कपिल शर्मा यांचीही नावं यादीत आहेत.
Users Today : 28