विनयभंग प्रकरणातील अल्पवयीन पोलिसांच्या तावडीतून झाला पसार

Khozmaster
1 Min Read

ल्याण- एका अल्पवयीन मुलीच्या वियनभंग प्रकरणात एका अल्पवयीन तरुणा टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिस त्याला बालसुधार गृहात घेऊन जात असताना पोलिसांची खाजगी वाहनातून हा अल्पवयीन तरुण पसार झाला.

टिटवाळा पोलिस या अल्पवयीन तरुणाचा शोध घेत आहेत. आपले पुढे काय होणार ? या भिती पोटी त्याने पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टिटवाळा परिसरात एका अल्यवयीन मुलीचा विनयभंग अल्पवयीन तरुणाने केला. त्या अल्पवयीन तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. अल्पवयीन तरुणाला भिवंडी येथील बालसुधार गृहात हजर करण्यासाठी पोलिस त्याला घेऊन टिटवाळ्याहून भिवंडीच्या दिशेने बुधवारी दुपारी निघाले होते.र पोलिसांची खाजगी गाडी भिवंडीतील सावद परिसरात थांबली. पाेलिसांची गाडी थांबताच हा अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यातून निसटला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांच्या हाती तो काही लागला नाही. या बाबत टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश कदम यांचे म्हणणे आहे की, सावद परिसरात वाहतूक कोंडी होती. त्यावेळी अल्पवयीन तरुण पसार झाला. त्याचा शोध घेत आहे. तो लवकर सापडणार.

मात्र या अल्पवयीन तरुणाने जेलमध्ये जावे लागेल या भितीपोटी पलायन केले आहे. तो अन्य कुठे निघून जाऊ नये. त्याने काही चुकीचे पाऊल उचलून नये अशी चिंता त्याच्या कुटुंबियांना सतावित आहे. त्याचा पोलिसांनी लवकर शोध घ्यावा असे त्याच्या कुुटुंबियांचे म्हणणे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *