*पालघर :सौरभ कामडी * . शाळांची गुणवत्ता सुधारावी , विद्यार्थी, पालक ,शाळा व्यवस्थापन समिती, समाज आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शाळा विकासाला हातभार लागावा विविध्द विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबविले जावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . केंद्र स्तर , तालुका स्तर जिल्हा , विभाग आणि राज्य या स्तरावर शाळांचे मूल्यमापन करून शाळांना भव्य बक्षीस ठेवण्यात आले होते . मोखाडा तालुक्यातून नेहमी अनेक उपक्रमात आग्रेसर आसलेली जिल्हापरिषद ISO शाळा कोचाळे केंद्र किनिस्ते ही शाळा मोखाडा तालुक्यातून प्रथम आली आज दिनांक 06/9/2024 रोजी जिल्हा परिषद आध्यक्ष मा. प्रकाशची निकम साहेब , राज्यमंत्री दर्जा , आमदार सुनील जी भुसारा साहेब , पंचायत समिती मोखाडा सभापती युवराज गिरंधले, उपसभापती प्रदीप वाघ साहेब , गटविकास अधिकारी , आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तीन लाखाचा धनादेश , स्मृती चिन्ह शाल श्रीफळ देवून गौरविण्यात आले . मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांचे मूल्यमापन ज्या मुद्यावर करण्यात आले त्या मुद्यांना अनुसरून , या मध्ये जिल्हा परिषद शाळा कोचाला शाळेने आपल्या शाळेत अनेक उपक्रम राबविलेआहेत . त्या मध्ये विद्यार्थ्यांन मार्फत वर्गसजावट , शाळेच्या आवारात जवळपास ११० पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड केलेली आहे . शाळेच्या रंगविलेल्या बोलक्या भिंती , गुण प्रबोधनात्मक सुविचार , तसेच शाळेचं विद्यार्थी मंत्रिमंडळ ही आहे , शालेय मंत्रिमंडळ मार्फत शाळेचे कामकाज चालते , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शाळेत सुंदर परसबाग तयार केलेली आहे , या परसबागेत हिरवी मिरची , टोमॅटो, वांगी, कढीपत्ता , कांदे यांची लागवड केलेली आहे . सिझन नुसार अनेक भाज्यांची लागवड करून त्यांचा शाळेत पोषण आहारात वापर केला जातो , मेरी माती मेरा देश उपक्रमाअंतर्गत ही शाळेने सक्रिय सहभाग नोंदवला होता . इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आणि १२५ विद्यार्थी संख्या आसलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना लहान पणापासून आर्थिक बचतीचे धडे मिळावे व आर्थिक साक्षर व्हावे म्हणून शाळेची बचत बँक आहे . बचत बँकेचे सर्व व्यवहार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीच पाहतात . प्रत्येक विद्यार्थ्याला पास बुक देण्यात आले आहे . पैशे काढण्यासाठी , भरणा करण्यासाठी स्लीप आहेत . खाउचे पैशे जमा करतात . आणि जेंव्हा काही आडचन भासली तेंव्हा पैशे काढतात ही . ,, विद्यार्थी शाळेत उपस्थिती प्रमाण ही जवळपास ९९%आसते . शाळेत वाचनालय आहे सर शनिवारी मुले पुस्तक घेवून घरी जातात व आणून जमा करतात , , या वर्षी शाळेने क्रीडा स्पर्धेत तालुका तर समुहागान , नाट्य आणि वकृत्व स्पर्धेत जिल्ह्यापर्यंत मजल मारली होती . शाळेत स्काऊट गाईड पथक आहे , स्वच्छता मॉनिटरिंग उपक्रमात शाळेचं सक्रिय सहभाग आहे विद्यार्थी आपण केलेले चांगले काम सांगतात आणि त्याच व्हिडीओ शाळेच्या फेसबुक पेज वर अपलोड केला जातो . , आपल्या राज्या व्यतिरिक्त इत्तर राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी शाळेने केरळ राज्याची निवड केली होती . शाळेत कबडी खो खो, लंगडी अशा देशी खेळांना प्राधान्य तर दिले जातेच त्याच प्रमाणे लुप्त होत चाललेले विटी दांडू, लगोरी , हे ही खेळ मुले शाळेत खेळतात . त्याच प्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात येते . शाळेत सर्व आवश्यक साहित्यासहित प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे . , बदलत्या जीवनशैलीचा लहान मुलांवर होणाऱ्या विकारांची माहिती देण्यासाठी डॉक्टरांच्या मार्फत, विविध संस्थांच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तीचे व्याखाने शाळेत आयोजित केली जातात . किशोरवयीन मुलीसाठी तर या शाळेने सॅनिटरी नॅपकीन वेंडीग मशीन , फिस्पोजल मशीन आणि मुलींना आराम करण्यासाठी गादि पलगासहीत जिल्ह्यातील पहिली रेस्ट रूम उभारली आहे . हात स्वच्छ धून्या साठी शाळेत पुरेसे पाणी , नळांच्या तोट्या हँडवॉश साबण नेहमी उपलब्ध आसतात . स्वयंरोजगार, व्यवसाय , व्यापार या संदर्भातील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने शाळेत आयोजित केली जातात , भौतिक सुविधा वाढविण्यासाठी शालेने अनेक स्वंयसेवी संस्थांची मदत घेवून आजपर्यंत दहा लाखाच्या आसपास वस्तू च्या स्वरूपात मदत मिळविली आहे , त्या मध्ये , स्पार्क फाऊंडेशन कडून एक वर्गखोली दुरुस्ती, शाळेच्या मैदानात अडीच हजार स्क्वेअर फूट शेड बनवून दिला आहे , जाणीव फाऊंडेशन कडून शाळेला साऊंड सिस्टीम, माऊली ग्रुप ने स्मार्ट टिव्ही ,लक्ष फाऊंडेशन कडून रेस्ट रूम साठी आवश्यक साहित्य आणि अनेक संस्थांकडून शालेय विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्य मिळविले आहे . ,शाळा व्यवस्थापन समिती शाळेला नेहमी मदत करते ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती ने मिळून गेल्या वर्षी शाळेला iso नामांकन मिळवून दिले . शाळा विकासा साठी गावाचा एक दिवस शाळेसाठी हा ही उपक्रम शाळेत राबविला जातो , शाळेने तंबाखू मुक्त शाळेचे प्रमाणपत्र मिळविले आहे, शाळेत कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होईल अशा प्लास्टिक वापरास बंदी आहे . व शाळा प्लास्टिक मुक्त शाळा आहे. पोषण आहारातील शिल्लक अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी शाळेने एक वेगळी शकल लढवली आहे . शिल्लक अन्न वाया जाऊ नये या साठी शाळेत बदक पाळली आहेत . .माझी विद्यार्थी यांचा संघ स्थापन करून शाळेला आवश्यक ती मदत माजी विद्यार्थी, पालक यांच्याकडून मिळते . जिल्हा परिषद शाळा कोचाळे शाळा जिल्ह्यामध्ये उपक्रमशील शाला म्हणून प्रसिद्ध आहे . आताच इस्रो बँगलोर येथील जिल्हा परिषद पालघर यांच्या अभ्यास दौऱ्यात या शाळेचे तीन विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांचा समावेश होता . शाळेत प्रत्येक उपक्रम राबविताना मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर , उपशिक्षक राजाराम जोशी , गणेश वाघ , दिनेश ठोमरेसर सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती , कोचाळे गावाचे ग्रामस्थ व पालक अतोनात मेहनत घेतात . शालेय प्रशासकीय बाबी, उपक्रम या संबंधी केंद्राचे केंद्रप्रमुख नागू वीरकर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. वसंत महाले साहेब यांचे सदैव मार्गदर्शन लाभते . मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात शाळेने जिल्हास्तरावर तालुक्याचं प्रतिनिधीत्व करताना गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला प्रत्येक घटकावर मोलाचे मार्गदर्शन केले