जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान येथील विज्ञान अध्यापिका शगुफ्ता जमाल यांना नुकताच कृतिशील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अमूल्य सेवा देऊन विद्यार्थी घडविणारी शिक्षिका शगुफ्ता जमाल यांना अता पर्यंत शासकीय व निमशासकीय संस्थांकडून गौरविण्यात आले आहे विद्यार्थ्यांना कला क्रीडा सांस्कृतिक शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी क्षेत्रांमध्ये भरघोस यश मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारी शिक्षिका मनहून त्यांची ओळख आहे रविवारी त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग अकोला च्या वतीने माजी गृहराज्यमंत्री डॉ रनजीत पाटील शिक्षण अधिकारी प्राथमिक रतन सिंग पवार व मान्यवरांचे हस्ते त्यांना कृतिशील शिक्षक रतन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे,त्यानां सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल महान केंद्राच्या वतींना केंद्र प्रमुख शाहिद इक्बाल खान मुख्याध्यापक शाफिक अहेमद खान राहुल्लह खान मो अश्फाक सायद असरार रिजवान अहेमद गुल ए राणा मकसूद अहेमद आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे
शगुफ्ता जमाल यांचे काऱ्यांचा गौरव,,,,
शगुफ्ता जमाल हे नेहमी विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहतात शिक्षणासोबतच महिला सक्षमीकरणासाठी नेहमी अग्रेसर असतात त्यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे
सीमा नजम
महिला प्रमुख अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य