३० वर्षांपासून सुरु होतं महापाप; हॉस्पिटलवर धाड टाकताच अधिकारी हादरले, नाशकात भयंकर प्रकार उघड

Khozmaster
4 Min Read

चालू वर्षी मे महिन्यात माता व तिच्या बाळाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशीसाठी महात्मा नगरमधील पंड्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या महापालिकेच्या पथकाला सोमवारी (दि. ९) अवैध गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा मोठा साठा आढळून आला, महापालिकेकडे या रुग्णालयातील नोंदणी नसतानाही गेल्या तीस वर्षांपासून या ठिकाणी अवैधरीत्या गर्भपात केल्याचे पुरावे पालिकेच्या पथकाला मिळाले आहेत.

विशेष म्हणजे डॉ. आर. एन. पंड्या यांनी अवैध गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा फ्रीज व लॉकर्समध्ये ठेवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा सुरू केला असून, रात्री उशिरापर्यंत संबंधित डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहरात सहा वर्षांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक डॉक्टर अवैधरीत्या गर्भपात करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रुग्णालयातच अवैधरीत्या सोनोग्राफी मशीन आढळून आले होते. त्यानंतर शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या महात्मानगरमध्ये पंड्या हॉस्पिटलमध्ये गेल्या तीस वर्षांपासून अवैध गर्भपात सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. आर. एम. पंड्या यांच्या पंड्या हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेल्या एका महिलेला प्रसूतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यानंतर दुसऱ्या एका रुग्णालयात उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. या मातामृत्यूची चौकशी सुरू असताना पंड्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपाताचा साठा आढळून आला.मातामृत्यू संशोधन समितीचे प्रमुख महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत शेटे, डॉ. नितीन रावते यांनी सोमवारी अचानक सकाळी पंड्या हॉस्पिटलला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयांची कागदपत्रे तपासणी सुरू केली असता, अवैधरीत्या गर्भपातासाठी वापरला जाणारा साठाच हाती लागला. एमबीबीएसची पदवी असलेल्या डॉ. पंड्यांवर वैद्यकीय विभागाने प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांनी मौन बाळगल्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. ३० वर्षांपासून अनधिकृत रुग्णालय या तपासणीत संबंधित रुग्णालयाची मागील ३० वर्षांपासून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणीच नसल्याची बाब समोर आली. अवैधरीत्या गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे १८ कीट सापडले, विशेष म्हणजे रुग्णालयातील फ्रीज, कपाटाची लॉकर यात अवैध गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या कोणत्याही नोंदी ठेवण्यात आलेल्या नाहीत. १९९४ पासूनच्या गर्भपाताच्या नोंदी असल्या तरी रुग्णांचे मात्र रेकॉर्डच नसल्याचे समोर आले आहे. सन १९९२-९३ पासून रुग्णालय सुरू आहे.सकाळी पंड्या हॉस्पिटलला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयांची कागदपत्रे तपासणी सुरू केली असता, अवैधरीत्या गर्भपातासाठी वापरला जाणारा साठाच हाती लागला. एमबीबीएसची पदवी असलेल्या डॉ. पंड्यांवर वैद्यकीय विभागाने प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांनी मौन बाळगल्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. ३० वर्षांपासून अनधिकृत रुग्णालय या तपासणीत संबंधित रुग्णालयाची मागील ३० वर्षांपासून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणीच नसल्याची बाब समोर आली. अवैधरीत्या गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे १८ कीट सापडले, विशेष म्हणजे रुग्णालयातील फ्रीज, कपाटाची लॉकर यात अवैध गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या कोणत्याही नोंदी ठेवण्यात आलेल्या नाहीत. १९९४ पासूनच्या गर्भपाताच्या नोंदी असल्या तरी रुग्णांचे मात्र रेकॉर्डच नसल्याचे समोर आले आहे. सन १९९२-९३ पासून रुग्णालय सुरू आहे गेल्या वर्षी मे महिन्यात शहराच्या हद्दीत पाच मातामृत्यूंची नोंद झाली. त्या संदर्भात सोमवारी (दि. ९) महापालिकेत मातामृत्यू संशोधन समितीची बैठक बोलविण्यात आली होती. संबंधित महिला ही पंड्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली होती. त्यामुळे समितीचे प्रमुख डॉ. तानाजी चव्हाण, डॉ. प्रशांत शेटे, डॉ. रावते यांनी थेट पंड्या रुग्णालयाला भेट देऊन चौकशी सुरू केली. या चौकशीत डॉ. पंड्या यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अधिक चौकशी केली असता, रुग्णालयाला परवानगी नसल्याचे आणि या ठिकाणी अवैध गर्भपात केले जात असल्याचे समोर आले.

पंड्या हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता, या ठिकाणी अवैध गर्भपातासाठी वापरला जाणाऱ्या औषधांचा अनधिकृत साठा आढळला आहे. या रुग्णालयाची पालिकेकडे नोंदही नाही.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *