रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुण्यातून वंदे भारत धावणार; असे असेल वेळापत्रक

Khozmaster
2 Min Read

पुण्यातून वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून हुबळी-पुणे आणि पुणे-हुबळी या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे आता पुणे ते सांगली असा प्रवास तीन तास ५५ मिनिटांमध्ये होणार आहे.अल्पवधीतच प्रवाशांच्या पसंतीला उतरलेली वंदे भारत एक्स्प्रेस वेगवेगळ्या शहरांमधून सुरू होत होती; पण सतत पुण्याला डावलले जात होते. त्यामुळे पुण्यातून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली जात होती. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका असल्यामुळे काही शहरांमधून ‘वंदे भारत’ सुरू होणार असल्याची चर्चा होती. येत्या १५ सप्टेंबर रोजी देशात १० वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. त्यामध्ये पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक जलदगती रेल्वेने जोडले जाणार आहे. या गाडीची देखभाल दुरुस्ती हुबळी येथे केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस हुबळीहून पहाटे पाच वाजता सुटणार आहे. ती बेळगावला सहा वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. मिरजेला सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांनी, सांगलीमध्ये सकाळी साडेनऊ वाजता आणि सातारा येथे १० वाजून ३५ मिनिटांनी दाखल होईल. पुण्यात दुपारी दीड वाजता गाडी पोहोचेल. पुण्याहून हुबळीला जाणारी गाडी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल. सांगलीत सहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल, तर हुबळीत ही गाडी रात्री पावणे अकरा वाजता पोहोचेल.वंदे भारत एक्सप्रेस आठ कोचची असून पूर्णपणे वातानुकूलित असेल.वंदे भारत एक्सप्रेस आठ कोचची असून पूर्णपणे वातानुकूलित असेल.
वंदे भारत एक्सप्रेस आठ कोचची असून पूर्णपणे वातानुकूलित असेल.पुणे -हुबळी अंतर ५५८ किलोमीटर इतके असेल.
वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येत असून, १५ स्पटेंबरला ती हुबळीवरून धावणार आहे. पुणे ते हुबळी अशी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.

0 8 9 4 7 9
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *