पुणे :
महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात आज रुपाली ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. झाशीच्या राणी प्रतिष्ठानच्या वतीने झालेल्या या आंदोलनात महिलांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत संताप व्यक्त केला.
चारित्र्यहननाच्या आरोपांवरून आंदोलन पेटले
रुपाली ठोंबरे यांनी आरोप केला की, “महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांनीच महिला भगिनींचे चारित्र्यहनन केले असून, त्यामुळे महिलांचा सन्मान धोक्यात आला आहे.”
या गंभीर आरोपांनंतर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी पुण्यात आंदोलन पुकारले.
जोडे मारून संताप व्यक्त
या आंदोलनादरम्यान चाकणकर यांच्या फोटोला मेकअप करून जोडे मारण्यात आले, तसेच “रुपाली चाकणकर राजीनामा द्या”, “महिलांचा अपमान आम्ही सहन करणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
अनेक महिलांनी हातात फलक घेत ठोंबरे यांच्यासोबत संताप व्यक्त केला.
“महिला आयोगाच्याच अध्यक्षांकडून अन्याय” — ठोंबरे
रुपाली ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले,
“महिलांच्या हक्कांसाठी स्थापन झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडूनच महिलांचे चारित्र्यहनन होत असेल, तर हा समाजासाठी कलंक आहे. अशा व्यक्तीने तात्काळ राजीनामा द्यावा.”
त्यांनी पुढे म्हटलं,
“महिला भगिनींच्या सन्मानासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. हे आंदोलन पुढे अधिक तीव्र करण्यात येईल.”
राष्ट्रवादी काँग्रेसवरही ठोंबरे यांचा निशाणा
ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“तटकरे यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय का घेत नाहीत? महिलांविरोधातील वक्तव्ये आणि कृती सहन केली जाणार नाही,” असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
पुढील आंदोलनाचा इशारा
झाशीच्या राणी प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले की, जर लवकरच चाकणकर यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला नाही, तर राज्यभरात आंदोलन उभं करण्यात येईल.
महिला संघटनांकडून या प्रकरणात तातडीने चौकशी करून महिला आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न मिटवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Users Today : 18