माणुसकीपेक्षा पैशाला महत्त्व असलेल्या सध्याच्या समाजात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांमधील निराधार व्यक्ती, बेघर मुले आणि अनाथ बालकांसह घराबाहेर पडलेल्या वृद्धांना आधार देण्याचे कार्य सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील ‘प्रार्थना फाउंडेशन संस्थे’ने चालविले आहे. या सेवाकार्याचा विस्तार करण्यासाठी समाजातील सहृदयी मंडळींकडून हातभार मिळणे अपेक्षित आहे.
बार्शी तालुक्याच्या इर्लेवाडी गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रसाद विठ्ठल मोहिते आणि अनु मोहिते या तरुण दाम्पत्याने सामाजिक सेवेच्या बांधिलकीतून, एका ध्येयवादातून प्रार्थना फाउंडेशनची उभारणी २०१६ साली केली. स्वत:च्या दाहक अनुभवाने संवेदनशील बनलेल्या या समविचारी दाम्पत्याने अनाथ, फुटपाथवर भिक्षा मागणाऱ्या मुलांसाठी सुरुवातीला ‘वंचितांची शाळा एक पाऊल प्रगतीकडे’ या प्रकल्पाच्या माध्यमातून सेवाकार्याचा श्री गणेशा केला. भिक्षामुक्ती अभियानाच्या माध्यमातून ‘मुलांना भीक देऊन दुर्बल बनवण्यापेक्षा, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवा!’ असा संदेश देत समाजात जनजागृती केली. त्याचवेळी तरुणांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी ‘कृतिशील तरुणाई निवासी शिबिरे’ घेतली
Users Today : 9