नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. संकेत आणि त्यांचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा राऊतांनी केला. आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांना श्रावण-गणपतीत गोमांस चालतं का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.नागपुरात फडणवीसांच्या नाकासमोर एवढा मोठा अपघात झाला, १७-१८ जण हॉस्पिटलमध्ये आहेत. ज्याच्या मालकीचं वाहन आहे, त्याचं साधं नाव एफआयआरमध्ये नाही. प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवरुन अपघातानंतर त्याला बदलण्यात आलं, त्याला तुम्ही वाचवताय? तु्म्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाता करताय? त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं बिल मिळालेलं आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांचं बिल समोर आणलं पाहिजे. त्यात दारुचं बिल आहे. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात.. चिकन, मटण यांच्यासोबत बीफ कटलेटचंही बिल आहे.. गोमांस… श्रावण आहे, गणपती आहेत… आम्हाला हिंदुत्व शिकवतात? पोलिसांनी बिल जप्त केलंय. तुम्ही बिफ खायचं आणि लोकांचे बळी घ्यायचे.. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
Users Today : 26