साक्षी कैलास पळसकर हिची पोलीस दलात निवड – शेतकरी कन्येची गगनभरारी

Khozmaster
1 Min Read
कवठे येमाई दि. १२ (प्रतिनिधी)  शिरूर तालुक्यातील कवठे यमाई च्या पोकळदरा परिसरात वास्तव्यास असणारे शेतकरी कैलास पळसकर यांची कन्या साक्षीने जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात तिची नुकतीच निवड झाली आहे. अगदी लहान पणापासून शासकीय नोकरी करण्याचे स्वप्न साक्षीने उराशी बाळगले असताना अनेक अडचणींवर यशस्वी मात करून तिने ते स्वप्न सत्यात उतरवले आहे.नुकत्याच  झालेल्या ठाणे शहर पोलीस निवड चाचणीत साक्षीने शारिरीक चाचणीत ४१ गुण तर लेखी परिक्षेत ९० गुण मिळवत पोलीस पदाला गवसणी घातली आहे.
कवठे येमाई येथील स्थायिक शेतकरी कुटूंबातील साक्षी कैलास पळसकर हिचे चौथी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.तर माध्यमिक शिक्षण गावातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पुर्ण केले.पुढील शिक्षणाची फारशी सुविधा नसताना तिने उच्चमाध्यमिक शिक्षण मुखईच्या अश्रम शाळेत तर निघोज (ता.पारनेर ) येथील मुलिकादेवी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत शासकिय नोकरी करण्याचे ध्येय निश्चित केले होते.वडिलांचेही चांगले शिक्षण झालेले मात्र वेळोवेळी प्रयत्न करूनही त्यांना पोलीस होता आले नाही त्यांचे तेच स्वप्न जणू कन्या साक्षीने पोलीस होऊन पूर्ण केले.मुलीच्या जिद्दीचे समाजाने,गावाने तोंड भरून कौतुक केले.मिळालेल्या यशाने साक्षीचा ही आनंद गगनात मावेनासा झाला.  तर उत्तरोत्तर अशीच यशाची शिखरे सर करणार असल्याचे साक्षीने सांगितले.गरीब शेतकरी कुटूंबातील अशा या जिद्दी साक्षीची यशोगाथा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६
0 6 3 6 5 3
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *