डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरे! नाशिकच्या विद्यार्थ्याचा रशियात मृत्यू; घरी येऊन घेतलेलं गणपतीचं दर्शन

Khozmaster
1 Min Read

जेलरोड येथील हुशार, अष्टपैलू विद्यार्थी अभिषेक युवराज जाधव (वय २१) याचा रशियात टॅक्सी व ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. डॉक्टर बनण्यासाठी रशियात गेलेला अभिषेक एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. अभिषेकचे वडील महापालिकेत कर्मचारी आहेत.
रशियात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेला अभिषेक गणेशोत्सवासाठी जेलरोडला आपल्या घरी आला होता. मंगळवारी (दि. १०) पहाटे तो विमानाने रशियाला गेला. विमानतळावरून अभिषेक व चार मित्र टॅक्सीने वसतिगृहाकडे जात होते. वसतिगृहाजवळ पोहचत असतानाच रस्त्याच्या बाजूला मोठ्या इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाजवळ एका ट्रकने त्यांच्या टॅक्सीला धडक दिली. काही तरी अडथळा आल्याने हा ट्रक अचानक रस्त्यावर आला व टॅक्सीला जाऊन धडकला. अभिषेक कारमध्ये चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेला होता. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अन्य मित्र जखमी झाले आहेत. अभिषेकचे पार्थिव आज, गुरुवारी (दि. १२) सायंकाळपर्यंत दिल्लीहून मुंबईत व नंतर नाशिकला आणण्यात येणार आहे. भारतीय दूतवास त्यासाठी मदत करीत आहे.अभिषेकचे शालेय शिक्षण जेलरोडच्या के. एन. केला शाळेत तर बारावीनंतरचे शिक्षण भुजबळ नॉलेज सिटीमध्ये झाले. त्याला एक लहान बहीण आहे. अभिषेकचे वडील नाशिक महापालिकेत कर्मचारी आहेत. अभिषेकच्या आईने महापालिकेची मागील निवडणूक लढवली होती. के. एन. केला शाळेचा माजी विद्यार्थी असलेल्या अभिषेकला वक्तृत्व, क्रिकेट आदीची आवड होती. नाटकातही तो काम करायचा. त्याला अभिनयाचे पारितोषिकही मिळाले होते. अष्टपैलू अभिषेकच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *