कवठे येमाई दि. १५ (प्रतिनिधी)- शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील मच्छिंद्र श्रीराम लंघे यांच्या शासनमान्य रास्त रेशन दुकानातून यावर्षीच्या गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिका धारकांना ” आनंदाचा शिधा” वाटप करण्यात येत आहे. १०० रुपयात उपलब्ध करण्यात आलेल्या हा आनंदाचा शिधा संच मिळण्यापासून लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचेही लंघे यांनी बोलताना सांगितले. लंघे यांच्या दुकानात ७५३ शिधापत्रिका धारक असून ६५६ कार्डधारकांचा शिधा उपलब्ध झाला आहे. सर्व शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देताना चालू महिन्याचा आनंदाचा शिधा शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यास सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. शासनाकडून प्राप्त रवा, साखर, डाळ, तेल प्रत्येकी एक किलो प्रमाणात शिधापत्रिका धारकांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी अनेक शिधापत्रिका धारक उपस्थित होते. नागरिकांनी लवकरात लवकर आपला शिधा घेऊन आण्याचे आवाहन लंघे यांनी केले आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व सामान्य नागरिकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंद द्विगुणीत झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी मा.सरपंच सोनालीताई खैरे,ग्रा. सदस्य मनीषाताई नरवडे, दक्षता कमिटी सदस्य मनोहर नरवडे ,पत्रकार अरुणकुमार मोटे व अनेक मान्यवर ग्रामस्थ, शिधापत्रिका धारक उपस्थित होते. मच्छिंद्र लंघे यांच्या रास्त भाव दुकानातून सातत्याने उत्कृष्ठ सेवा मिळत असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Users Today : 9