मराठ्यांसाठी राजीनाम्याची घोषणा मग आमच्यासाठी काय निर्णय घेणार? महायुतीच्या आमदारांना धनगर समाजाचा सवाल

Khozmaster
2 Min Read

सोलापूर : सोलापूर शहरातील भाजप आमदार व माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून आंदोलन केले आहे. त्याचबरोबर पंढरपूर येथे धनगर समाजाचे आमरण उपोषण देखील सुरू आहे. मराठा समाजापाठोपाठ धनगर समाज देखील आरक्षणाची मागणी केली आहे.

ढोल ताशा वाजवून आंदोलन

आंदोलक शेखर बंगाळे आक्रमक झाले असून त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, सोलापुरातील लोकप्रतिनिधींनी आंदोलनास्थळी भेट द्यायला हवी होती. भाजपचे आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांनी आंदोलन स्थळावर जाऊन भेट दिली नाही. त्यामुळे आम्ही ढोल वाजवून आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया शेखर बंगाळे यांनी दिली आहे.

कानशिलात लगावून आमदारांना जाग आणणार

ते पुढे म्हणाले की, आजतागायत लोकशाही मार्गाने आंदोलने केली. सोलापूरचे माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांवर भांडारा उधळून धनगर आरक्षणाची मागणी केली होती. तरीही सरकार धनगर आरक्षणासाठी जागे होत नाही. भविष्यात आम्ही हिंसक स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे करणार आहोत. धनगर आरक्षणासाठी आमदारांच्या कानाखाली वाजवून त्यांना जाग आणणार. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा देखील अडविणार. असाइशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.

सुभाष देशमुख धनगरांच्या जोरावर निवडून आले

भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात धनगर समाजाचे निर्णयाक मतदान आहेत. तरीही सुभाष देशमुख धनगर समाजासाठी विधानसभेत एक शब्दही बोलत नाहीत.आगामी विधानसभा निवडणुकीत धनगर समाज सुभाष देशमुख यांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा शेखर बंगाळे यांनी व इतर धनगर बांधवानी दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अद्याप कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला सरकट ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे. अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण सुर करणार आहेत.

0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *