सोलापूर : अप्पर तहसिल कार्यालयावरून मोहोळ तालुक्यातील वातावरण टाईट झाले आहे.लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी मोहोळ येथे येणार आहेत. मात्र तालुक्यातील जनतेने तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ तालुका कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे शिलेदार म्हणून ओळख असलेले आणि राज्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.अजित दादा आपसे बैर नही….,राजन ‘तेरी खैर नही असे घोषवाक्य मोहोळमध्ये गाजत आहे. मोहोळ येथील तहसील कार्यालय अनगर गावात गेल्याने एक महिन्यापासून विरोध सुरू झाला आहे.अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे गेल्याने मोहोळ तालुक्याच्या जनतेवर अन्याय झाला. अप्पर तहसील कार्यालय तालुक्याच्या मुख्य ठिकाणी असावे, अशी मागणी जोर धरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्या अगोदर मोहोळ मधील वातावरण ढवळून निघाले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोहोळ येथील जनसन्मान यात्रेला हजर राहणार आहेत. रविवारी (२२ सप्टेंबर) मोहोळ शहरात जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार सभा घेणार आहेत.त्यांच्या दौऱ्यानिमित्त अनगर आणि मोहोळ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जास्त उत्सुकता ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील हे आपल्या सर्वोच्च नेत्याच्या दौऱ्यात सहभागी होणार का? आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र येणार का?, याची चर्चा मोहोळ मतदारसंघात रंगली आहे.अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयास कडाडून विरोध केला आहे. त्यावरून त्यांचे माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्याबरोबर आरोप-प्रत्यारोप एक महिन्यापासून रंगले आहेत. या वादातून अजित पवार काय तोडगा काढतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.