अजितदादांना किती मिळणार पेन्शन, गोविंदाच्या बायकोची बिग बॉसवाल्यांना टशन,

Khozmaster
2 Min Read

हिंमत असेल तर महापालिका निवडणुका घेऊन दाखवा, संजय राऊत यांचं चॅलेंज, मुंबई-पुण्यासह १४ पालिकांमध्ये लोकप्रतिनिधीच नाहीत, भाजपच्या सांगण्यावरुन निवडणुकांच्या तारखा ठरतात, राऊतांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बसले असते, तर त्यांना ९० हजारांची पेन्शन मिळाली असती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनाही पुढील काळात पेन्शन मिळणार, ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी प्रत्येकाच्या पेन्शनचा हिशोबच मांडला, 

पुण्यातील धनकवडी येथील तरुणाची रायगड येथे आत्महत्या, पत्नीला मेसेज करुन लोकेशन कळवलं, वरंधा घाटाजवळ असलेल्या भोर हद्दीत सापडला मृतदेह

तिसरीत शिकणाऱ्या चिमुकलीला शाळेत खेळता खेळता हार्ट अटॅक, जागीच कोसळल्यानंतर शिक्षिकेकडून उठवण्याचा प्रयत्न, मात्र वैद्यकीय मदत मिळण्याआधीच अखेरचा श्वास, उत्तर प्रदेशातील लखनौ येथील घटना, कुटुंब शोकसागरात

कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन गदारोळ सुरुच, त्यातच शहरातील अन्य रुग्णालयातही महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना, बालरुग्णाजवळ झोपलेल्या आईचे लैंगिक शोषण, वॉर्डबॉयला अटक

सणासुदीच्या दिवसांत सोन्याचे दागिने खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांना डोकेदुखी, वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ, सोने ७३,६६० रुपयांवर गेल्याने खरेदीदार हवालदिल

बजाज हाऊसिंगचे शेअर्स अलॉट झालेल्या गुंतवणूकदारांच्या प्रतिक्षेला अपेक्षेनुसार फळ, विक्रमी सबस्क्रिप्शननंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात दिमाखात एंट्री, लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची भरघोस कमाई, गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण

झी मराठी’वरील ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम वीस वर्षांनी थांबला, मुलाखतीवेळी आईचा फोटो दाखवताच आदेश बांदेकर भावूक, संपूर्ण बांदेकर कुटुंबालाच अश्रू अनावर, मी टूरहून आलो, आईला हाक मारली, तिने डोळे उघडले, रात्री ती गेली आदेश बांदेकर आठवण सांगताना गदगदले

अभिनेता गोविंदाच्या पत्नीला बिग बॉसची अनेकदा ऑफर, सुनिता अहुजा यांचा दावा, मी टॉयलेट साफ करेन असं वाटतं का? मिसेस गोविंदा मेकर्सवर भडकल्या, शाहरुखच्या बायकोला ऑफर देण्याची हिंमत आहे का? सुनितांनी निर्मात्यांना सुनावलं,
लंडनमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर कसोटी मालिकेसाठी भारतात परतलेला विराट कोहली पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये, पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार, संपूर्ण भारतीय संघ चेन्नईत सरावात व्यस्त
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *