“पुढच्या वर्षी लवकर या…”, गुलालाची उधळण करत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात

Khozmaster
2 Min Read

लालबागमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सकाळपासूनच गर्दी

मुंबई – महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आज सांगता लालबागमध्ये मोठ्या उत्साहात होत आहे. लालबागमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला

लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर आज त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे, १लालबागमधील रस्ते आज गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून जाणार आहेत…

जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाची आज राजेशाही मिरवणुक काढण्यात येणार आहे

राजेशाही विसर्जन मिरवणूक तब्बल २४ तास चालणार आहे, उद्या सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जन होणार आहे….

बाप्पाचं मोहक रुप पाहण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची गर्दी होऊ लागली आहे

सकाळी ९:३० वाजता विधिवत पूजा आणि आरती करण्यात येणार आहे, त्यानंतर लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणुक सकाळी ११ वाजता लालबाग मार्केटमधून निघणार आहे

नांदेडमधील 2 हजार 900 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

नांदेड – आज दिला जाणार लाडक्या गणरायाला निरोप – 2 हजार 900 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, – 3 कृत्रिम तलाव, 26 मूर्ती संकलन केंद्र. – लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांसह नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनातील तयारी सुरू

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनातील तयारी सुरू

पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार दगडूशेठ गणपतीची आरती

दगडूशेठ गणपती आज चार वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार

अजित पवार दगडूशेठ गणपती मंदिरात येणार

मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी सज्ज

पुण्यात थोड्या वेळात विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात

मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी निघणार

रथ सजवून तयार करण्यात आला आहे

थोड्या वेळात मिरवणुकीला होणार सुरुवात
एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या मुंबईचा राजा गणेशगल्ली, लालबागचा राजा, तेजूकाय, काळाचौकीचा महागणपती, चिंतामणी यांसह ठिकठिकाणी बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यातही मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकींना लवकरच सुरुवात होणार आहे.

0 8 9 4 7 9
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *