मुंबई प्रतिनिधी :-
बॉलीवूडची आंतरराष्ट्रीय ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धडाकेबाज पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘GlobeTrotter’ या अॅक्शन-ड्रामा चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून, त्यात प्रियंका राऊडी, धाडसी आणि अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
पोस्टरमध्ये ती पिवळ्या साडीत, हातात बंदूक रोखून उभी असल्याचं दिसत असून, फॅन्सनी तिच्या या अंदाजाला “मंदाकिनी meets मॅव्हरिक” असं भन्नाट टॅग दिलं आहे.
प्रियंकाने पोस्टर शेअर करताना लिहिलं –
“She’s more than what meets the eye… Say hello to Mandakini. #GlobeTrotter”
राजामौलींचा ‘वेलकम ऑन बोर्ड’
या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनीही प्रियंकाच्या या लूकचं पोस्टर शेअर करत,
“जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीची पुनर्परिभाषा करणारी महिला… देसी गर्ल, पुन्हा स्वागत आहे!”
असं लिहून उत्साह व्यक्त केला.
फॅन्सची Q&A सत्रात धडाधड प्रश्नवर्षाव
प्रियंकाने अलीकडेच चाहत्यांशी ऑनलाइन संवाद साधला. बहुतेक प्रश्न तिच्या आगामी ‘SSMB29’ (राजामौली आणि महेश बाबू यांच्यासोबत) या चित्रपटावर होते.
फॅन्सचे प्रश्न —
• तेलुगू इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव?
• हैदराबादची बिर्याणी चाखलीय का?
यावर प्रियंका म्हणाली,
“मला चित्रपटात अजून सुरुवात आहे… पण ती अधिरी पोयंडी (आश्चर्यजनक) आहे! आणि हो, हैदराबादची बिर्याणी जगातील सर्वोत्तम आहे.”
मंदाकिनीचा रहस्यमय अंदाज — १५ तारखेला होणार मोठा खुलासा
एका चाहत्याने विचारले की ती मोठ्या कार्यक्रमासाठी दक्षिण भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करणार का?
यावर प्रियंकाने उत्तर दिलं —
“श्श… १५ तारखेला बरंच काही उघड होईल.”
लवकरच ट्रेलर, रिलीज डेटची प्रतीक्षा
‘सिटाडेल’ आणि ‘लव्ह अगेन’नंतर प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा हायलाइट रोलमध्ये मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘GlobeTrotter’ची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नसली तरी ट्रेलर लवकरच येणार असल्याचे संकेत प्रियंकाने दिले आहेत.
Users Today : 17