गणेशोत्सवातील सर्वात भावूक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. कोणी दीड दिवसानंतर तर कोणी तीन दिवसानंतर, कोणी पाच दिवसानंतर तर कोणी सात दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. काही लोक अनंत चतुर्थीला म्हणजेच दहा दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. गणपती जसा वाजत गाजत येतो तसा त्याचा निरोप समारंभ सुद्धा तितकाच वाजत गाजत होतोसध्या काही ठिकाणी गणपती विसर्जन सुरू झाले आहे. अनेक जण विसर्जन दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत बाप्पााला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करत आहे.गणपती विसर्जनाच्या तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना हार्दिक शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही व्हॉट्सअप, मेसेजद्वारे खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकता.